ई-पेपरकृषीवार्ता
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने लवकरच जिल्ह्याच्या सर्व भागात चारा छावण्या उभारणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा पुढाकार
पुढच्या आठ नऊ महिने पशुपालकासाठी अडचणीचा काळ असल्यामुळे शिवसेना शेतकऱ्याच्या पशुपालकांच्या मदतीसाठी

0
0
7
8
5
7
शिवसेना शिंदे गटाच्या वतीने लवकरच सर्व तालुक्यात चारा छावण्या उभारणार – शिवसेना प्रवक्ते योगेश केदार
तुळजापूर दि 2 प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार यांनी दिली आहे.
तीव्र दुष्काळ निर्माण झाल्यामुळे शेतकरी राजा अडचणीत सापडला आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात सोन उभारण्याचा निर्णय सर्व पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि इतर शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला. शिवसैनिकांना त्यात सहभागी होऊन सेवा करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांसोबत मंत्रालय मुंबई येथे सरनाईक यांच्या दालनात त्या अनुषंगाने मंगळवारी बैठक देखील पार पडली.
सरकारी चारा छावण्या सुरू करण्याचा शासन निर्णय जेंव्हा होईल तेंव्हा होईल. पण सामान्य शेतकऱ्यांनी आपणास कुटुंबाचा घटक म्हणून सांभाळलेली गुरे ढोरे चारा पाण्यविणा राहू नयेत यासाठी संवेदनशील पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतला आहे. पक्षाच्या वतीने खर्च करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सदर बैठकीत राज्य प्रवक्ते योगेश केदार उमरगा शहराचे नगराध्यक्ष किरण गायकवाड, माजी जिल्हाप्रमुख अजित पिंगळे, युवा नेते आनंद पाटील तसेच इतरही पदाधिकारी उपस्थित होते.
0
0
7
8
5
7



