
0
0
7
8
5
8
तुळजापुरातील ४ ऑक्टोबर महाआरोग्य मोफत उपचार शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा, – शिवसेना नेते ऋषिकेश मगर यांचे आवाहन
तुळजापूर दि ३ डॉ. सतीश महामुनी
४ ऑक्टोबर रोजी तुळजापुरात प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आणि मोलाचे उपचार करण्यासाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, सर्व रोगाचे उपचार या शिबिरामध्ये मोफत होणार आहेत तुळजापूरच्या इतिहासातील हे सर्वात मोठे आणि लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारे महत्त्वाचे महाआरोग्य शिबिर होत आहे अशी माहिती शिवसेना नेते ऋषिकेश मगर यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे.
तुळजापूर येथे मृणाली फाउंडेशन, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, शिवसेना डॉक्टर सेल, पवन राजे फाउंडेशन व आरोग्य विभाग तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने तुळजापुरात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते ऋषिकेश मगर व डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी दिली आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रेरणे मधून खासदार ओमराजे निंबाळकर व डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष धनंजय पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर ४ऑक्टोबर रोजी या शिबिराचे तुळजापूर येथे पुजारी मंडळ सभागृह येथे आयोजन करण्यात आले आहे . या शिबिरामध्ये पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सर्व अवयवांचे उपचार होणार आहेत यासाठी तज्ञ ८० डॉक्टरांची टीम या महा आरोग्य शिबिराला उपस्थित राहणार आहे अशी माहिती शिवसेना नेते ऋषिकेश मगर व तालुकाध्यक्ष डॉ.राजेश पाटील यांनी दिली.

सर्व नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करण्यासाठी पुजारी मंडळ सभागृहामध्ये दिवसभर उपस्थित राहावे येताना आपली जुनी तपासणीची कागदपत्रे सोबत आणावीत. या शिबिरामध्ये महिलांच्या आरोग्य तपासणीवर विशेष पक्ष असून त्यासाठी स्त्रीरोग तज्ञांच्या ३ वेगवेगळ्या विशेष टीम काम करणार आहेत. गंभीर आजारावर मोफत उपचार या शिबिरात होतील असे सांगून शिवसेना नेते ऋषिकेश मगर यांनी सांगितले की, हृदयविकाराशी संबंधित अँओग्राफी एन्जिओप्लास्टी त्वचारोग लहान मुलांचे आजार व इतर गंभीर आजारावर या शिबिरात मोफत उपचार केले जाणार आहेत.

तुळजापूर शहराच्या इतिहासामध्ये होणारे हे लोकहिताचे महाआरोग्य शिबिर आहे शिवसेनेचा ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाने चाललेला प्रवास अनुभवण्याच्या हेतूने आपण या शिबिराचे आयोजन केले आहे या महा आरोग्य शिबिराच्या निमित्ताने पायाच्या पोटापासून डोक्याच्या केसापर्यंत असणाऱ्या सर्व अवयवांच्या तपासणीचे आणि उपचाराचे हे शिबिर आहे यातील सर्व तपासणी आणि उपचार मोफत असल्यामुळे सर्वांनी आग्रहाने या शिबिरात सहभागी व्हावे असे आग्रहाचे आमंत्रण या निमित्ताने शिवसेना नेते ऋषिकेश मगर आणि तालुका सेल अध्यक्ष डॉ.राहुल पाटील यांनी केले आहे.
0
0
7
8
5
8



