ई-पेपरब्रेकिंग

केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक यांना दिला तुळजाभवानीचा आशीर्वाद, तुळजापुरातून भवानी ज्योत हातामध्ये सुपूर्त करून दिल्या जन्मदिनाच्या शुभेच्छा

केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपाचे नेते गुलचंद व्यवहारे यांच्याकडून भवानी ज्योती यात्रेची आयोजन

0 0 7 8 5 8

तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचा केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक यांना भवानी ज्योत माध्यमातून दिला आशीर्वाद , भाजप नेते गुलचंद व्यवहारे यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा 

तुळजापूर दि ७  डॉक्टर सतीश महामुनी 

र्केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांच्या यशस्वी कारकीर्दीचा गौरव करण्यासाठी तुळजापूर येथून भाजपाचे प्रदेश सदस्य गुलचंद व्यवहारे यांनी आपल्या सहकारी यांच्यासह भवानी ज्योत मंत्री महोदयाच्या सुपूर्त केली.

तुळजाभवानीचे निसिम भक्त असणारे केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक  यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या सोहळ्याचे आयोजन गोव्यामध्ये करण्यात आले होते, तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचा या मंगलमय प्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी तुळजापूर येथून भवानी ज्योत प्रदेश सदस्य गुलचंद व्यवहारे याच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमांमध्ये सहभागी झाली. पारंपरिक गोंधळी आणि संबळाचे वादन करीत या ज्योतीचे कार्यक्रम स्थळी पोहोचल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या भवानी ज्योतीचे पूजन केले आणि देवीचे आशीर्वाद घेतले.

केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक यांनी अनेक वेळा तुळजाभवानी देवीचे तुळजापूर येथे येऊन दर्शन घेतले आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या भवानी ज्योत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांना शुभेच्छा देण्याचा योग याच्यापेक्षा चांगला दुसरा असू शकत नाही देवीचा आशीर्वाद त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी ज्या भक्ती भावाने या भवानी ज्योतीचा स्वीकार केला त्यामुळे त्यांचे आणि तुळजाभवानी देवीचे नाते किती जिव्हाळ्याचे आहे हे पुन्हा एकदा दिसून आले अशी प्रतिक्रिया यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य गुलचंद व्यवहारे यांनी व्यक्त केली.

 याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे  राज्यपाल  पुसापती अशोक गजपती राजू व मुख्यमंत्री गोवा प्रमोद सावंत, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष दामू नाईक, गोवा बांधकाम मंत्री दिगंबर  कामत, खासदार सदानंद तानावडे, सिद्धेश नाईक भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य गुलचंद व्यवहारे यांची या निमित्ताने प्रमुख उपस्थिती होती.

पारंपरिक गोंधळ गाणारे गोंधळी या भवानी ज्योतीच्या सोबत असल्यामुळे या कार्यक्रमांमध्ये तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचा विशेष प्रभाव जाणवला येथे या भवानी ज्योतीचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित त्यांनी गर्दी केली वाजत गाजत ही भवानी ज्योत मंत्री महोदयांच्या हाती श्री गुलचंद्र व्यवहारे यानी सुपूर्त केली जय भवानी जय शिवाजीचा अशा जय घोषामध्ये केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांनी या आशीर्वादाचा स्वीकार केला. तुळजाभवानी देवीचा आशीर्वादच मला या भवानी ज्योतीच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांनी याप्रसंगी दिली. पत्रकार डॉक्टर सतीश महामुनी तुळजापूर.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 8 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे