ई-पेपर
तुळजापुरात छोटा व्यापाऱ्यांची कंत्राट दराकडून केली जाणारी लूट थांबवा, अतिरिक्त वसुली व्यापाऱ्यांना परत करा – विरोधी पक्षनेते अमोल कुतवळ यांची मागणी
फुटपाथ वसुली करणाऱ्या कांत्राटदाराची चौकशी करा मुख्याधिकाऱ्यांना विरोधी पाच नगरसेवकांचे निवेदन

0
0
7
8
5
8
तुळजापुरात व्यापारांनी जास्त कर देऊ नये, चौकशी करून दंडात्मक कारवाई करा – विरोधी पक्ष नेते अमोल कुतवळ
तुळजापूर दि ८ प्रतिनिधी
तीर्थक्षेत्रा असणाऱ्या तुळजापूर येथे फुटपाथरूम व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्याकडून जास्तीचा फुटपाथ कर वसूल केल्याच्या तक्रारी असून याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी नगरपालिकेतील पाच विरोधी नगरसेवकांनी मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्याकडे केली आहे. संबंधित कंत्राट दराने अतिरिक्त वसुली केल्याचे पुरावे याकडे असल्याचे या निमित्ताने पालिकेतील विरोधी बाकावर बसलेल्या नगरसेवकांनी म्हटले आहे. आम्ही व्यापाऱ्याच्या बाजूने खंबीरपणे उभे असून कोणीही न घाबरता निर्भीडपणे अतिरिक्त वसुलीच्या विरोधात मुख्याधिकाऱ्याकडे तक्रार करावी अशी सूचना देखील या विरोधी पाच नगरसेवकांनी तुळजापुरातील व्यापाऱ्यांना केली आहे.
या संदर्भात विरोधी पक्षनेते अमोल कुतवळ यांनी अनेकांनी आमच्याकडे जास्त रक्कम घेतल्याच्या तक्रारी केल्यामुळे आम्ही ही मागणी केली आहे. संबंधित कंत्राटदार यांनी निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम वसूल केली का नाही याची चौकशी केली जावी आणि जास्तीची वसुली केली असेल तर ती व्यापाऱ्याला परत करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
ज्या ठिकाणी नगरपालिकेने कर घेण्याच्या जागा निश्चित केले आहेत अशा चार प्रमुख ठिकाणी सदर फूटपातकर वसूल करण्यात यावा, कंत्राटदाराच्या नियम व अटी तपासून त्याच्याकडून केली जाणारी वसुली याची देखील चौकशी करण्यात यावी. व्यापाऱ्यांनी निर्भीडपणे जास्त मागणी केल्यास मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार नोंद करावी किंवा आम्हा पाच नगरसेवकाकडे आपले म्हणणे सांगावे असेही यावेळी विरोधी पक्षनेते अमोल कुतवळ यांनी म्हटले आहे. याप्रसंगी नगरसेवक रणजीत इंगळे, नगरसेवक आनंद जगताप, नगरसेवक अक्षय परमेश्वर , नगरसेवक प्रगती गोपाळ लोंढे यांची निवेदनावर स्वाक्षरी आहे. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पाच नगरसेवकांनी व्यापाऱ्यांच्या बाजूने घेतलेल्या भूमिकेमुळे व्यापारी वर्गांमधून या भूमिकेचे जोरदार स्वागत करण्यात आले असून मुख्य अधिकारी अजिंक्य रणदिवे या प्रकरणी कोणता निर्णय घेतात याकडे देखील व्यापारी आणि शहरवासी यांची लक्ष लागले आहे.
0
0
7
8
5
8



