महाराष्ट्र
नवरात्र महोत्सवासाठी नगरपरिषद सज्ज, पालिका प्रशासन 24 तास अलर्ट – नगराध्यक्ष विनोद गंगणे यांची ग्वाही
छत्रपती शिवाजी महाराज चौकात भवानी ज्योतीचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या शुभहस्ते प्रज्वलन हजारो नवरात्र मंडळ येणार

0
0
7
8
5
1
नगरपालिका यात्रा नियोजनासाठी २४ तास सज्ज, भाविकांना नागरी सुविधा देण्यासाठी नगरपालिकेचा आराखडा तयार – नगराध्यक्ष विनोद गंगणे यांची ग्वाही
तुळजापूर दिनांक 9 डॉक्टर सतीश महामुनी
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या काळात कोणत्याही भाविकाला कुठलीच अडचण येणार नाही, भाविकांच्या सोयीसाठी नगरपरिषद २४ तास कार्यरत आहे, राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाच्या सूचना लक्षात घेऊन नगर परिषदेने यात्रा व्यवस्थापनाचा आराखडा केलेला आहे. पालिकेची अनुभवी नगरसेवक आणि अधिकारी कर्मचारी यांची टीम यात्रा काळात यात्रा व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुविधा देणार आहेत अशी ग्वाही तुळजापूरची नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी दिली. 
तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर नगर परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील परिसरात “भवानी ज्योत” प्रज्वलित करून नवरात्र महोत्सवाच्या तयारीचा शुभारंभ करण्यात आला.
नगराध्यक्ष श्री. विनोद भैया (पिंटू) गंगणे यांच्या शुभहस्ते भवानी ज्योत प्रज्वलित करण्यात आली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या काळात देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक तुळजापूर येथे येतात.
या पार्श्वभूमीवर भाविकांना सुरक्षित, सुलभ व सुरळीत दर्शन घेता यावे, तसेच महोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी नगर परिषद, पोलीस प्रशासन आणि मंदिर संस्थान प्रशासन यांच्या समन्वयातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. असे नगराध्यक्ष श्री. विनोद (पिटू )भैया गंगणे यांनी सांगितले.
नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदिवे, वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण आणि भाविकांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय राखून महोत्सवाचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यात येणार आहे असे मुख्याधिकारी अजिंक्य राणदिवे यांनी सांगितले.
या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. पाटील तुळजाभवानी मंदिर संस्थानचे तहसीलदार श्रीमती माया माने, तुळजापूरचे पोलीस निरीक्षक श्री. मांजरे नगर परिषद सदस्य तसेच नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात्रा काळात नगरपरिषद आणि सर्व शासकीय कार्यालयामार्फत वेगवेगळी जबाबदारी पार पाडली जाते या काळात या सर्व प्रशासकीय कामकाजाला स्थानिक नागरिकांनी व्यापारी यांनी सहकार्य केले पाहिजे. सर्व भाविकांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी सर्वांचे सहकार्य नगरपरिषदेला अपेक्षित आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून तुळजाभवानी देवीची ही यात्रा सबंध देशभर चांगल्या सुविधा देणारी यात्रा म्हणून सर्व परिचित होईल असा विश्वास देखील यावेळी नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी व्यक्त केला.
0
0
7
8
5
1



