ई-पेपरदेश-विदेशमहाराष्ट्र
दुष्काळाच्या गंभीर संकटातून वाचविण्याची शक्ती दे – नगराध्यक्ष विनोद ( पिटू ) गंगणे
शारदीय नवरात्र महोत्सवात मंदिर संस्थांची विश्वस्त व नगराध्यक्ष विनोद गंगणे यांची प्रमुख उपस्थिती...

0
0
7
8
5
8
आई भवानी दुष्काळाच्या संकटातून आम्हाला सावर – मंदिर संस्थानचे विश्वस्त व नगराध्यक्ष विनोद गंगणे
तुळजापूर दिनांक 11 प्रतिनिधी
दुष्काळाच्या तीव्र संकटांमधून आम्हा सर्व भाविक भक्तांना तूच सावर असे साकडे तुळजापूरचे नगराध्यक्ष व तुळजाभवानी मंदिर संस्थांची विश्वस्त विनोद गंगणे यांनी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या घटस्थापनेच्या निमित्ताने आई तुळजाभवानी समोर घातले. 
शारदीय नवरात्र महोत्सव निमित्ताने तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी महाराष्ट्राचे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीला या दुष्काळाच्या संकटातून शेतकरी राजा आणि आम्हा जनतेला बाहेर काढ असे साकडे घालून येथे येणाऱ्या भाविक भक्ताच्या सुविधा करण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने तयारी केली आहे. मुख्याधिकारी आणि सर्व विभाग प्रमुख यांना २४ तास सतर्क राहण्याच्या आदेश आपण दिलेल्या असून सर्व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी विशेष लक्ष दिले गेले आहे. पाण्याची व्यवस्था, विद्युत रोषनाई, पानपोई व्यवस्था, यासह प्रति वर्षाप्रमाणे सर्व यात्रेच्या यंत्रणा सुसज्ज ठेवल्या आहेत. कचरा संकलन करण्यासाठी देखील नियोजनबद्ध आराखडा तयार केलेला आहे अशी माहिती नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी दिली आहे. तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना निमित्ताने नगराध्यक्ष यांनी ही माहिती दिली याप्रसंगी त्यांचे कुटुंबीय त्यांच्या समवेत होते.
0
0
7
8
5
8



