महाराष्ट्र

आमदार राणा जगजितसिंह पाटील व जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ अर्चनाताई पाटील यांच्याकडून तुळजाभवानी देवीला साकडे, हे भवानी माते या दुष्काळाच्या संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढण्याचे बळ दे

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून घटस्थापनेच्या निमित्ताने भवानी मातेचे दर्शन, जिल्हा परिषद अध्यक्ष सौभाग्यवती अर्चनाताई यांच्याकडून तुळजाभवानी मंदिरात प्रत्यक्ष स्वच्छते साठी सहभाग

0 0 7 8 5 8

तुळजापूरच्या विकासामध्ये भाविक भक्तांच्या सुविधा यांना प्राधान्य – आमदार राणा जगजितसिंह पाटील

तुळजापूर दि  11 डॉ. सतीश महामुनी

तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास करताना व्यापारी पुजारी यांना विश्वासात घेऊन भाविक भक्तांच्या सुविधा चांगल्या होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, बाहेर पडण्याच्या मार्गाच्या पायऱ्याचे काम पूर्णत्वाला आले असून या सर्व विकास कामांना निश्चित चांगली गती प्राप्त होईल अशी अपेक्षा आमदार राणा जगजितसह पाटील यांनी व्यक्त केली.

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने नवरात्र महोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा घेत असताना त्यांनी मंदिरामध्ये सुरू असलेल्या विकास कामाचा देखील आढावा घेतला. याप्रसंगी मंदिर तहसीलदार माया माने, उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, नगरसेवक लखन पेंदे,  पालिकेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, तालुकाध्यक्ष आनंद करले इतर अधिकारी प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी घाटशीळ रोडवरील भाविकांना प्रवेश देण्याच्या मंडपाची आणि तेथील सर्व व्यवस्था आणि भाविकांना दिला जात असलेल्या सुविधा भाविकांची सुरक्षितता तसेच स्नान आणि दर्शनाची व्यवस्था या सर्वांचा आढावा घेतला. कोणताही परिस्थितीमध्ये भाविक भक्तांना चांगले दर्शन घेता आले पाहिजे त्यांचे सर्व कुलधर्म कुलाचार देखील परंपरागत पद्धतीने करता आले पाहिजेत याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशा सूचना देखील दिल्या.

तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास करण्याच्या अनुषंगाने राज्य शासन आणि पुरातत्त्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कामाला लवकरच चांगली गती प्राप्त होईल असा विश्वास देखील आमदार राणा जगजितसह पाटील यांनी या निमित्ताने व्यक्त केला. राज्यभरातून येणारा भाविकांना नवरात्रीचे नऊ दिवस आणि कोजागिरी पौर्णिमेचे तीन दिवस कोणतीही अडचण न येता दर्शन घेता यावे यात्रेशी निगडित असणाऱ्या सर्व घटकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतले जावेत अशी सूचना देखील आमदार पाटील यांनी यावेळी केली.  नवरात्र महोत्सवाच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौभाग्यवती अर्चनाताई पाटील यांनी आपल्या सहकार्यासह मंदिर परिसराची सुरू असलेले स्वच्छता यामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवला.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौभाग्यवती अर्चनाताई पाटील यांनी हातामध्ये झाडू घेऊन परिसराची स्वच्छता केली आणि नळाच्या पाण्यात द्वारे मंदिर परिसराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये स्वच्छता मोहीम स्वतः केली. तुळजाभवानी देवीच्या या दरबारामध्ये सेवा करताना खूप मोठा आनंद होतो देवीची नवरात्राची ही महिमा अनुभवताना नेत्र दीपक आनंद मिळतो, या भवानी मातेने या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने शेतकरी राजावर आलेले दुष्काळाचे संकट दूर करण्यासाठी शक्ती द्यावी आणि खऱ्या अर्थाने बळीराजाला सुखी करण्यासाठी तुळजाभवानी देवीने आशीर्वाद द्यावा अशी विनवणी आपण भवानी मातेच्या चरणी केल्याचे या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ अर्चनाताई पाटील यांनी सांगितले. भवानी माता नक्की येणाऱ्या काळात शेतकऱ्याच्या मदतीला धावून येईल असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 8 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे