कृषीवार्ताब्रेकिंग

बँक व फायनान्स तगाद्यामुळे तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथील शेतकरी आप्पा सोपान पवार आत्महत्या

उत्पन्न हातात येत नसताना कर्जाचा डोंगर वाढत चालल्याने शेतकरी अक्षरशः हातबल झाल्याचे वास्तव

0 0 2 6 6 1

कांद्याला भाव नाही, कर्जाचा तणावात हतबल शेतकऱ्याची आत्महत्या

तुळजापूर दि  ८ प्रतिनिधी

 तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथील शेतकरी आप्पा सोपान पवार (वय ५o वर्ष ) यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दि.८ फेब्रुवारी २०२६ रोजी गुरुवारी सकाळी उघडकीस आली. अपसिंगा ते ढेकरी रोडलगत असलेल्या त्यांच्या स्वतःच्या शेतात सकाळी साडेदहाच्या सुमारास साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले.

मृत शेतकऱ्यांकडे ४ एकर कांद्याचे पीक होते. मात्र सध्या कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने बँक व फायनान्सचे हप्ते कसे भरायचे, या चिंतेत ते होते. त्यातच बँक व फायनान्स कंपनीकडून  होत असलेल्या तगाद्यामुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे.

उत्पन्न हातात येत नसताना कर्जाचा डोंगर वाढत चालल्याने शेतकरी अक्षरशः हातबल झाल्याचे वास्तव या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.घटनेची माहिती मिळताच बीट अंमलदार चौधरी यांच्या चमूने पुढील कार्यवाही केली. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतर पुढील वास्तव स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, संबंधित प्रकरणी पंचनामा करून बँक व फायनान्स कोणते आहे कर्ज किती होते ते पुढील तपास सुरू आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे