ई-पेपरक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

शनिवारी मधु-स्मृती संगीत समारोह पंडित मधुप मुद्‌गल, डॉ. चेतना पाठक यांचे गायन

अभिजात संगीताप्रती आस्था वाढावी या प्रमुख उद्देशाने ‘मधु-स्मृती’ संगीत समारोह

0 0 1 8 1 2

पुणे : शास्रीय संगीताच्या दैदिप्यमान परंपरेला समृद्ध करून रसिक श्रोत्यांची अभिजात संगीताप्रती आस्था वाढावी या प्रमुख उद्देशाने ‘मधु-स्मृती’ संगीत समारोहाचे शनिवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी  आयोजन करण्यात आले आहे.

यात ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पद्मश्री पंडित मधुप मुद्‌गल (दिल्ली) आणि किराणा घराण्याच्या गायिका डॉ. चेतना पाठक (मुंबई) यांचे गायन होणार आहे. संगीत समारोह सायंकाळी ५ वाजता टिळक रोडवरील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या आवारात असलेल्या गणेश सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कलाकारांना भरत कामत, प्रणव गुरव (तबला), सुयोग कुंडलकर, अमेय बिच्चू (संवादिनी) साथसंगत करणार आहेत. मधु-स्मृती संगीत समारोहाचे उद्‌घाटन ज्येष्ठ शास्त्रीय गायक, पंडित सुहास व्यास यांच्या हस्ते होणार आहे.

अभिजात शास्रीय संगीत हे भारतीय संस्कृतीचे प्रमुख अंग आहे. संगीत शिक्षणाला समर्पित ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका डॉ. विद्या खांडवे व आजच्या तरुण पिढीचे आघाडीचे गायक कलाकार आदित्य खांडवे यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत समारोहाचे यंदाचे चौथे वर्ष आहे.

भारतीय शास्त्रीय संगीताचा शुद्ध वारसा जपणारे पंडित मधुप मुद्‌गल यांनी संगीतविषयक सखोल चिंतनही केले आहे. ते एक उत्तम गायकच नव्हे तर संगीताचे विद्वान अभ्यासक आहेत. त्यांच्या गायन शैलीवर गुरू व मार्गदर्शक पंडित कुमार गंधर्व यांचा प्रभाव दिसून येतो. परंपरा आणि नाविन्य यामधील सुवर्णमध्ये साधण्याची सखोल जाण असणारे, शिस्तप्रिय शिक्षक असून नवी दिल्ली येथील गांधर्व महाविद्यालयाचे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत.

डॉ. चेतना पाठक या पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या आहेत. त्यांनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीताचे सखोल प्रशिक्षण घेतले आहे. डॉ. चेतना पाठक यांना ग्वाल्हेर घराण्याचे दिग्गज गायक पंडित बाळकृष्णबुवा पुंछवाले यांच्याकडून टप्पा गायकीचे शिक्षण घेण्याचे भाग्य लाभले आहे.

 

 

5/5 - (1 vote)

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे