ई-पेपर

महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अजितदादांचा वाटा सिंहाचा, झालेले अपघाती निधन महाराष्ट्रावर आलेले मोठे संकट – भाजप नेते धर्मवीर बाळासाहेब शामराज

भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोधले यांच्या वाढदिवसानिमित्ताने सत्कार

0 0 2 6 6 1

अजितदादा यांच्या निधनाने महाराष्ट्राची प्रचंड हानी, न भरून येणारे नुकसान – भाजप नेते धर्मवीर बाळासाहेब शामराज

तुळजापूर दि २३डॉ. सतीश महामुनी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असणारे अजित दादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्र राज्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे, त्यांच्या राजकीय जीवनाचा सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आदर्श घेतला पाहिजे असे उद्गार भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते धर्मवीर बाळासाहेब शामराज यांनी काढले.

तुळजापूर येथे शासकीय विश्रामगृह येथे आयोजित एका अनौपचारिक वार्तालाप करीत असताना भारतीय जनता पार्टीची ज्येष्ठ नेते धर्मवीर बाळासाहेब शामराज यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अनेक आठवणी बोलून दाखवल्या. आम्ही राजकारणामध्ये मागील 25 30 वर्षापासून अजित दादांना पाहिले आहे. प्रत्यक्ष त्यांचा सहवास नसला तरी त्यांची कार्यपद्धती आणि त्यांनी राजकारणामध्ये निर्माण केलेला दबदबा अनुभवला आहे. येथील विश्रामगृहामध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव बोधले यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी अनौपचारिक चर्चा करत असताना अजित दादा पवार यांच्या आकस्मित अपघाताचे आहे त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे झालेल्या नुकसानीवर चर्चा करण्यात आली.

राजकीय क्षेत्रामध्ये निर्भीडपणा आणि ठोस भूमिका मांडणारा राज्याचा नेता म्हणून अजित दादा यांच्याकडे पाहिले जात होते. आगामी काळात नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीवरून अजित दादा निश्चितच राज्याची प्रमुख भूमिका सांभाळू शकले असते परंतु नियतीला ते मान्य नसल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघाताने महाराष्ट्र राज्याचे प्रचंड मोठे नुकसान केले आहे. न भरून निघणारे हे नुकसान आहे.

आजही आठवणीन डोळ्यात पाणी उभे राहते असे अजित दादांची जाणे अकल्पनीय आणि अकाली आहे, पुढील दहा ते पंधरा वर्षांमध्ये अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासामध्ये जे काम केले असते त्यावरून त्यांची राजकीय श्रेष्ठता आणि कटीबद्धता आमच्यासारख्या तालुका आणि जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी मार्गदर्शक अशीच आहे. निश्चितपणे राजकारणामध्ये अजितदादा नसल्यामुळे जन राजकीय कार्यकर्त्यांचे पक्षांचे आणि  निर्भीडपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची पोकळी न भरून निघणारी आहे असेही या निमित्ताने या वार्तालापामध्ये भाजपाचे नेते धर्मवीर बाळासाहेब श्यामराज म्हणाले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य गुलचंद व्यवहारे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव बोधले, संस्कार भारतीचे देवगिरी प्रांत सह महामंत्री पत्रकार डॉक्टर सतीश महामुनी, भाजपचे माजी शहर सरचिटणीस उमेश गवते, ज्येष्ठ विचारवंत महेश कुलकर्णी, सचिन अमृतराव  यांची याप्रसंगी उपस्थिती होती. या निमित्ताने शिवाजीराव बोधले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा शाल फेटा श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अजितदादा पवार यांचा मंत्रालयातील वावर आणि त्यांचा प्रभाव प्रशासनाला गतिमान करणारा होता, प्रशासकीय पातळीवर त्यांची असणारी पकड अन्य कोणत्याही राजकीय नेत्यांमध्ये दिसून येत नाही अशी प्रतिक्रिया या निमित्ताने भाजपचे प्रदेश सदस्य गुलचंद व्यवहारे यांनी व्यक्त केली.

यावेळी सहकार क्षेत्रामध्ये अजित दादा पवार यांनी केलेले काम आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या सहकार चळवळीला त्यांनी दिलेले पाठबळ ही महाराष्ट्राच्या विकासात्मक वाटचालीतील अत्यंत महत्त्वाची घटना आहे, अजितदादांचे शब्द आणि प्रशासकीय पातळीवर त्याची असलेली ताकद यामुळे शेकडो हजारो उद्योग आज महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. उद्योग उभारणी आणि तरुणांना रोजगार देण्यासाठी अजितदादनी दिलेले योगदान महाराष्ट्र कदापिही विसरणार नाही अशा शब्दांमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव बोधले यांनी अजित दादा पवार यांच्या विषयी मत व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे