ई-पेपरदेश-विदेश

दिल्ली येथे झालेल्या शिवजयंती कार्यक्रमात तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे उपस्थित, तुळजापूरकरांना अभिमानाची बाब…

छत्रपती शिवरायांची जयंती जगातील मराठी माणसासाठी प्रेरणादायी - नगराध्यक्ष विनोद गंगणे

0 0 2 6 6 1

छत्रपती शिवरायांची जयंती जगातील मराठी माणसासाठी प्रेरणादायी उत्सव – नगराध्यक्ष विनोद गंगणे

तुळजापूर दि 19  डॉ. सतीश महामुनी

दिल्ली येथे महाराष्ट्र सदन येथे साजरा करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे व माजी नगराध्यक्ष सौ अर्चनाताई गंगणे यांची उपस्थिती होती.

आपल्या खाजगी कार्यक्रमाच्या निमित्ताने तुळजापूरच्या नगराध्यक्ष विनोद गंगणे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य गुलचंद व्यवहारे, माजी नगराध्यक्ष सौ अर्चनाताई गंगणे दिल्ली येथे असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या महाराष्ट्र सदन येथील संपन्न होणाऱ्या शिवजयंती कार्यक्रमास त्यांनी उपस्थिती लावली

छत्रपती संभाजी महाराज यांच्या शुभहस्ते येथील शिवप्रभूंच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. या निमित्ताने महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी खासदार, माजी खासदार, उच्चपदस्थ अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी नगराध्यक्ष विनोद गंगणे यांचा वार्तालाप झाला.

दिल्ली येथे मोठ्या उत्साहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमाने साजरी झाली हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तुत्वाला अधोरेखित करणारा ठरला. या निमित्ताने दिल्ली येथील राजकारण समाजकारण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा परिचय झाला अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी दिली.

5/5 - (1 vote)

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे