कृषीवार्ता

पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने चेअरमन नारायण नन्नवरे यांनी दिल्या शहरवासीयांना शुभेच्छा

समर्थ नागरी पतसंस्थेच्या २५ वर्षाचा प्रवास प्रतिकूलतेवर मात करत

0 0 1 8 1 2

समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सव निमित्ताने रक्तदान शिबिर

तुळजापूर दि ४ प्रतिनिधी

तुळजापूर येथील समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने संस्थेच्या वतीने  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले,  ६१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला.  संस्थेच्या रौप्य महोत्सव निमित्ताने संस्थापक चेअरमन नारायण नन्नवरे यांनी शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

शिबिराचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन नारायण नन्नवरे, व्हा चेअरमन श्रीकांत भोजने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव सज्जन जाधव,  संचालक  राजेंद्र माळी, संजय व्हटकर, श्रीकांत देशमाने, शिवाजी गायकवाड, संतोष इंगळे, रवींद्र ताटे यांच्यासह संस्थेचे सभासद खातेदार ठेवीदार बहुसंख्य संख्येने हजर होते.

शिबिरास सोलापूर येथील मल्लिकार्जुन रक्तपेढीचे सहकार्य लाभले शिबिराच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अभिजित म्हेत्रे, अश्विनी तांबे, सुनील शेरेकर, तानाजी फुलसुंदर, भागवत गुंड, जावेद शेख, श्रीनिवास मुळे, गणेश ठेले , आशिष भोजने, तुषार डोंगरे, अशपाक सय्यद  मधुकर साळवे, प्रवीण मोरे, सुरज जगताप यांनी परिश्रम घेतले. समर्थ नागरी पतसंस्थेच्या २५ वर्षाचा प्रवास प्रतिकूलतेवर मात करत सहकाराच्या माध्यमातून केलेला यशस्वी कार्य आहे, यामध्ये सभासद, शहरातील नागरिक, संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी यांनी केलेले कष्ट मोलाचे आहे. यानिमित्ताने मी संस्थेचा संस्थापक चेअरमन म्हणून कौतुक करतो आहे असे मनोगत चेअरमन नारायण नन्नवरे यांनी व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 1 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे