ई-पेपरनोकरी

राणा जगजीतसिंह पाटील यांनी शिवसेनेच्या विषयी गैरसमज निर्माण करू नये राज्य प्रवक्ते योगेश केदार यांची सूचना

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष पदावरून राज्य प्रवक्ते योगेश केदार यांनी जाहीर भूमिका मांडली

0 0 3 5 3 8

लोकशाही मार्गाने पक्षश्रेष्ठीच्या संमतीने काहीही झाले तरी चालेल परंतु चुकीची विधाने करू नये – योगेश केदार यांची भूमिका

शिवसेना पक्षाबद्दल चुकीचा संदेश पोहोचविण्याचा अधिकार कोणालाही नाही त्यामुळे आपण हे मतप्रदर्शित करत असून शिवसेना धाराशिव जिल्ह्यामध्ये संघटित आहे याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नाही त्यामुळे राणा जगजीत सिंह पाटील यांनी काहीही सांगितले तरी त्याचा उपयोग होणार नाही असे आवाहन शिवसेनेचे नेते राज्य पवक्ते योगेश केदार यांनी केले आहे.

धाराशिव मध्ये महायुती अभेद्य आहे, पण काही नेत्यांना शिवसेना पक्षात फूट पाडून हा डोळ्यात डोळे घालून बघणारा पक्ष कमजोर करायचा आहे. हा उघड अजेंडा राणा पाटील यांच्या सोबत मिळून शिवसेनेचेच काही नेते राबवत आहेत.

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सोबत जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काहिजण भेटले. त्यापैकी काहींनी लगेच तानाजी सावंत सहकारी गटाला वगळून धाराशिव मध्ये सत्ता स्थापन करणार! अश्या बातम्या पेरल्या. त्यात आघाडीवर ते राणा पाटलाचे चिरंजीव मल्हार पाटील अन गँग. या गोष्टी का  केल्या जात आहेत? माजी मंत्री शिवसेना नेते तानाजी सावंत शिवसेनेत नाहित का? आमच्या सारखे शिवसेना पक्षाच्या हितासाठी राणा पाटलाच्या चुकीवर बोट ठेवत आहेत, तर लगेच योगेश केदार हे तानाजी सावंतांच्या गटाचे आहेत अश्या वावड्या पेरल्या जात आहेत.

राणा पाटलाचा विरोध म्हणजे शिवसेनेत गटबाजी असा अर्थ जर कोणी काढत असेल तर त्याचा हेतू तपासणे गरजेचे आहे. तरी मी स्पष्ट करू इच्छितो की मी पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करतो. त्यांनी मला जवळ केले, जबाबदारी दिली. माझी निष्ठा त्यांच्या सोबत आहे. धाराशिव जिल्ह्यात माझा कुणी एक नेता नाही. माझ्यासाठी शिवसेना पक्षाचे जिल्ह्यातील सर्व नेते माझे नेते आहेत. असो, मुळात शिवसेना पक्षाच्या चिन्हावर त्यांचे उमेदवार घुसवले आणि निवडून आल्यावर त्यांना पळवून नेले. शिंदे साहेबांना जेंव्हा हा विषय समजला तेंव्हा त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत पळवून नेलेले उमेदवार समोर आणले जाणार नाहीत तोपर्यंत चर्चा होऊ शकत नाही. शिंदे साहेबांच्या कडक भूमिकेनंतर अनेक दिवस विचार करून त्या उमेदवारांना आणले गेले. यातून शिवसेनेत त्यांनी त्यांची माणसे पेरली असल्याचे सिध्द झाले. बरेच लोक उघडे पडले. अजून बरेच नेतेगण आहेत जे तुमची स्लीपर सेल म्हणून काम करत आहेत. आतून घात करत आहेत. त्यांच्या विषयी पुरावे समोर येत आहेत. योग्य वेळी पक्ष नेतृत्वाकडे ते सादर करुच.

माझे राणा पाटलांना आवाहन आहे की, जिल्हापरिषद अध्यक्ष तुमच्याच घरातला करा. तशी उघड पत्रकार परिषद घ्या ना! तुम्हाला कोण रोखले आहे? जर वरिष्ठांनी आदेश दिल्यास आमचाही विरोध असण्याचे कारण नाही. परंतु शिवसेना पक्ष फोडण्यासाठी तुम्ही चालवलेले प्रयत्न बंद करा. तुम्हाला काय वाटते मुंबईतील वरिष्ठ नेत्यांच्या पर्यंत केवळ तुमचीच पोहोच आहे? तुम्ही जे काही खोटे नाटे सांगाल तेच भाजपचे नेते मान्य करतील असा समज काढून टाका. तुम्ही मूळ भाजप कशी संपवत आहात हे संघातील आणि भाजप च्या नेत्यांना समजत आहे. या जिल्हापरिषद निवडणुकीत केवळ स्वतःच्या बायकोला जिल्हापरिषद अध्यक्ष करण्यासाठी तुम्ही भाजपातील इतर सर्व ओपन महिला उमेदवारांना पराभूत करवून खड्यासारखे बाजूला केले. भारतीय जनता पार्टी चा स्ट्राईक रेट ५०% पेक्षा खाली आला. त्याला कारणीभूत तुमचा छुपा अजेंडा आहे. अनेक दशके काम करणाऱ्या भाजप नेत्यांची तुम्ही काय गत करून ठेवली? हे देवेंद्र फडणवीस साहेबांना माहीत नाही काय? ज्या दिवशी भाजप सत्तेच्या बाहेर जाईल त्यानंतर किती दिवस तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते भाजप माध्ये राहतील ? याचाही अभ्यास भाजप ला आहे. असो, त्याविषयी भाजपचे जिल्ह्यातील नेते वरती बोलतीलच. आम्हाला त्यात बोलायचा अधिकार नाही. महायुती ही झालीच पाहिजे. पण शिवसेना आणि भाजप अशी बरोबरीने तसेच सन्मानाने युती व्हावी. एकमेकांचा उचित सन्मान राखून युती करायला सुरुवातीपासून कुणाचीच अडचण नव्हती. परंतु आमच्या शिवसेनेतील काही नेत्यांना वाड्यावरची लाचारीच पत्करायची म्हटल्यावर त्याला इलाज नाही. जनतेने महायुतीला कौल दिला आहे. त्यात शिवसेना पक्षाचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त आहे. जर आमच्या नेत्यांनी तिकीट वाटपावेळी सन्मानजनक वाटाघाटी केल्या असत्या तर ही वेळच आली नसती. धाराशिव हा शिवसेना धनुष्य बाणाचाच गढ आहे हे दाखवू न देता आले असते. पण असो…. शिवसेना पक्षाचा पदाधिकारी म्हणून मी सर्वच नात्यांमध्ये संवाद निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न केले. पालकमंत्री साहेब, सावंत साहेब, रवी सर सर्वांच्या सोबत काम केले. आम्हा शिवसैनिकांना सत्ता स्वाभिमानाने पाहिजे. लाचारी पत्करून नाही अशी कडवट भूमिका शिवसेनेचे राज्य प्रवक्ते  योगेश केदार यांनी व्यक्त केली आहे. व्यक्तिगतरीत्या राणा जगदीश पाटील यांच्या विषयी बोलण्याचा आमचा चुकीचा हेतू नाही परंतु जर शिवसेनेबद्दल त्यांच्याकडून चुकीचा संदेश जात असेल तर त्याला उत्तर देणे आणि तो चुकीचा विषय खोडून काढणे हा आमच्या पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्यामुळे हे मत आपण व्यक्त करीत असल्याचे योगेश केदार यांनी सांगितले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 5 3 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे