ब्रेकिंगमहाराष्ट्र

ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांना साहेबराव हंगरेकर साहित्य गौरव पुरस्कार

0 0 1 8 1 2

ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांना साहेबराव हंगरेकर साहित्य गौरव पुरस्कार

तुळजापूर दिनांक 27 प्रतिनिधी

महाराष्ट्रातील नामवंत कवी अशोक नायगावकर यांना तुळजापूरचे दिवंगत आमदार साहेबराव हंगरेकर स्मृती साहित्य गौरव पुरस्कार देऊन समारंभ पूर्वक सन्मानित करण्यात आले. प्रचंड टाळ्यांच्या  कडकडाटात मानपत्र देऊन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांचा सत्कार करण्यात आला. येथील स्कायलंड येथे आयोजित समारंभात नगराध्यक्ष विनोद गंगणे, उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, संस्थेचे अध्यक्ष अमर हंगरगेकर, प्रा. प्रशांत मोरे ,बीडचे कवी अविनाश भारती ,छत्रपती संभाजी नगर येथील कवी नारायण पुरी, कवी  रविंद्र केसकर कवि देविदास पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी दिवंगत आमदार साहेबराव हंगरगेकर स्मृती साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल हा तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद आपणास प्राप्त झाल्याचे सांगून प्रदीर्घ कळ आपण कवितेच्या क्षेत्रात जे केले  याविषयी त्यांनी मार्मिक भाष्य केले. या निमित्ताने मराठवाडा साहित्य परिषद शाखा, तुळजापूर आणि साहेबराव हंगरगेकर फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्राची हास्यधारा या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.  लोककवी प्रा. प्रशांत मोरे ,बीडचे कवी अविनाश भारती ,छत्रपती संभाजी नगर येथील कवी नारायण पुरी यांनी अत्यंत दर्जेदार कविता सादर करून तुळजापूरकरांची मने जिंकली.प्रारंभी प्रास्ताविक कवी दास पाटील यांनी केले. सूत्रसंचलन कवी रवींद्र केसकर यांनी तर आभार प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष अमर हंगरगेकर, कार्यवाह विजय देशमुख, अरुण कुलकर्णी, किरण हंगरगेकर, देवेंद्र पवार, देवेंद्र हंगरगेकर,ॲड ओंकार मस्के, यश हंगरगेकर,तुषार सूत्रावे,अनिल हंगरगेकर,आदित्य हंगरगेकर, आण्णासाहेब क्षीरसागर, संदीप गंगणे, दिलीप भारती, आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.

5/5 - (1 vote)

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे