नोकरीमहाराष्ट्र

धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी अर्चनाताई पाटील अध्यक्ष होणे गरजेचे, राजकीय समीकरणांचा विचार करता

केंद्रात राज्यात सत्ता असताना जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा परिषदेची सत्ता महत्त्वाचे

0 0 3 5 3 8

जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी अर्चनाताई पाटील योग्य उमेदवार

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी पूर्व उपाध्यक्ष व आता नव्याने होणाऱ्या अध्यक्ष अर्चनाताई राणा जगजीत सिंह पाटील या अत्यंत योग्य आणि सबंध जिल्ह्याला योग्य न्याय देणारे नेत्या ठरणार आहेत. एकमेकांना विरोध करण्याच्या राजकारणामध्ये त्यांना होणारा विरोध तात्कालीक आहे. डॉक्टर पद्मश्री पाटील आणि राणा जगजीत सिंह पाटील यांची राजकारणातली तयारी राजकारणातील हिम्मत आणि राजकीय परिपक्वता मोठी आहे. डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या कार्यकाळात जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास झाला नाही हे वास्तव आहे. याच काळात जिल्ह्याचा विकास होणे सर्व दृष्टीने फायदेशीर ठरले असते परंतु राज्य पातळीवरचे राजकारण करत असताना जिल्ह्याच्या विकासाकडे पाहिजे तेवढे ताकतीने त्यांना लक्ष देता आले नाही आणि त्यांच्या सोबत आमच्या लोकांनी देखील विकास कामांचा पाठपुरावा केला नाही. त्याचेच भांडवल करून आज राणा जगजीत सिंह पाटील आणि अर्चनाताई पाटील यांना विरोध होत आहे. आज त्यांना विरोध करणारे सर्वच नेते मंडळी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या मुशी मधून व मार्गदर्शन मधून तयार झाले आहेत . परंतु लोकशाही आहे म्हणून हे सर्व सुरू आहे.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अगोदर अर्चनाताई पाटील आणि राणा जगजीत सिंह पाटील तसेच महायुतीच्या भाजप पक्षाकडून अर्चनाताई पाटील याच जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या दावेदार आहेत अशा प्रकारची घोषणा केलेली होती. वास्तवात केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळे व जिल्ह्यावर राणा जगजीत सिंह पाटील यांचे वर्चस्व असल्यामुळे अर्चनाताई पाटील यांच्या नावाला पाठिंबा देणे केव्हाही जिल्ह्याच्या आणि विकास कामांच्या फायद्याचे आहे.

अध्यक्ष कोणीही झाला तरी माझ्या तालुक्याचा माझ्या गावाचा विकास झाला पाहिजे अशी भूमिका घेणारे किती लोक याच्यामध्ये आहेत हाच आजच्या या अर्चनाताई पाटील यांना विरोध करणार्‍यांच्या पाठीमागचा मोठा प्रश्न आहे. कोणाला का आणि कशासाठी विरोध करायचा कुठपर्यंत विरोध करायचा आणि थांबायचे कुठे हे ज्या राजकारण्यांना आणि ज्या राजकीय काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तालुक्याला आणि गावाला कळत नाही तेच गाव आणि तेच नेते लोकनेते विकास कामांमध्ये मागे पडतात हे पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्राने वेळोवेळी आपल्या कामातून आणि कृतीतून दाखवून दिले आहे.
म्हणून सौभाग्यवती अर्चनाताई पाटील यांना विरोध करणे म्हणजे धाराशिव जिल्ह्याच्या विकासात्मक घडामोडी साठी चुकीचे वाटते. पाटील घराण्यावर टीका करणे हा धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात मोठा फॅशनचा विषय आहे पद्मश्री आणि राणा दादा यांना विरोध केल्याशिवाय इतरांना नेता वाटतच नाही अशी देखील परिस्थिती आहे. त्यामुळे स्वभाग्यवती अर्चनाताई पाटील याच जिल्हा परिषद धाराशिव चे अध्यक्ष असूनही क्रमाप्रमुक्त गरजेचे आणि जिल्ह्याच्या विकासासाठी प्रोत्साहन देणारे आहे.

– डॉक्टर सतीश महामुनी तुळजापूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 5 3 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे