क्रिडा व मनोरंजन

एस. के. जी. फाउंडेशन सामाजिक भान राखणारी संस्था – उद्योजक शिवाजी नरूणे

जिल्हा परिषद प्रशाला देवकुरळी येथे समारंभ साजरा

0 0 3 5 3 8

दुबई येथील उद्योजक शिवाजी नरुणे यांची समारंभाला प्रमुख उपस्थिती

देवकुरळी प्रशालेमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार संपन्न

तुळजापूर दिनांक 18 प्रतिनिधी डॉ सतीश महामुनी

एस के जी फाउंडेशन ही संस्था सामाजिक जबाबदारी सांभाळून वेगवेगळे उपक्रम राबवते समाजाला आपण कुठेतरी उपयोगी पडले पाहिजे या भावनेने संस्था अनेक वर्षापासून काम करते आहे तुळजापूर तालुक्यातील देवकूरळी या गावाबरोबर संस्थेचे भावनात्मक जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले आहेत असे उद्गार दुबई येथील उद्योजक शिवाजी  नरुणे यांनी काढले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवकुरळी येथे इयत्ता पहिली ते सातवी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुणे शिवाजी नरुणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच हनुमंत जाधव साक्षी मोरे गणेश मोरे व्यवस्थापन समिती अध्यक्ष आदिनाथ जाधव देविदास ताकमोगे यांची उपस्थिती होती. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. एस. के. जी. फाउंडेशन दुबई यांच्या वतीने येथे विविध उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक चतुर्भुज डोंगरे , सूत्रसंचालन श्रीमती कांचनदेवी काशीद यांनी व आभार पांडुरंग जावळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज पाटील, सतीश महामुने, स्वाती बळे, ज्ञानेश्वरी जाधव यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी शिवराज जाधव इयत्ता पहिली, संजना जाधव इयत्ता दुसरी, शौर्य गुंड इयत्ता तिसरी, श्लोक चव्हाण इयत्ता चौथी, आदिती नवगिरे इयत्ता सहावी, आश्लेषा ताकमोगे इयत्ता सातवी या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

2.5/5 - (2 votes)

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 5 3 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे