महाराष्ट्रराजकियसंपादकीय

भारतीय जनता पार्टीचा सत्ता कार्यकाळ धाराशिव जिल्ह्यासाठी सुवर्णकाळ, मोठमोठ्या योजना लागल्या मार्गी, आमदारांना जगजितसिंह पाटील यांचे नेतृत्वाने केला पाठपुरावा 

गुढी पाडव्याच्या निमित्ताने आनंदाची बातमी, लवकरच सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे धावणार

0 0 3 5 3 8

भारतीय जनता पार्टीचा सत्ता कार्यकाळ धाराशिव जिल्ह्यासाठी सुवर्णकाळ, मोठमोठ्या योजना लागल्या मार्गी, आमदारांना जगजितसिंह पाटील यांचे नेतृत्वाने केला पाठपुरावा

तुळजापूर दिनांक 19 डॉक्टर सतीश महामुनी

भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा कार्यकाळ खऱ्या अर्थाने धाराशिव जिल्ह्यासाठी सुवर्णकाळ होतो आहे, इतिहासामध्ये नोंदली जाणारी घटना म्हणून सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्ग या सरकारने मंजूर करणे आहे, तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने 1865 कोटी रुपयांची दिलेले पॅकेज आहे, सातत्याने शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये मदत करणारा पिक विमा सारख्या मदतीचा भाग असो किंवा जलयुक्त शिवार सारख्या जमिनीची सिंचन क्षमता वाढवण्यासाठी केलेला प्रयत्न…. अशा सर्व प्रयत्नांचा परिपाक धाराशिव जिल्ह्याच्या आगामी होणाऱ्या विकासामध्ये समोर दिसणार आहे. या सर्व विकासकमांच्या पाठपुराव्यासाठी जिल्ह्याचे नेते आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे सुरू असलेले प्रयत्न या सर्व विकासकमांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी कारणीभूत आहेत.

धाराशिव  जिल्ह्यातील अविकसितपणा दूर करण्यासाठी सर्वात मोठे प्रयत्न आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून झाले आहेत. रेल्वे प्रकल्पाच्या पाठपुराव्याच्या निमित्ताने सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाची पूर्तता होण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून राज्याच्या हिश्याची रक्कम ४५२ कोटी मंजूर करून घेऊन ती रेल्वे खात्याकडे वर्ग करण्यापर्यंत आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विशेषतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे त्यांनी जो सक्षम आणि यशस्वी पाठपुरावा केला. त्याच्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये 452 कोटी रुपये आणि त्यानंतर किंमत वाढलेली रक्कम म्हणून 1800 कोटी रुपये राज्याचा हिस्सा देण्यासाठी मंत्रिमंडळाचे मान्यता मिळाली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भागीदारी मधून हा रेल्वे प्रकल्प साकार होत असताना याचे श्रेय निश्चितच आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांना जाते, त्या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी आणि गतिमानतेसाठी त्यांच्याकडून जे प्रयत्न होत आहेत जे कष्ट घेतले जात आहेत. वेळोवेळी आढावा घेणे आणि केंद्र राज्य सरकारकडे योग्य पाठपुरावा करणे या सर्व कामांच्या पाठपुराव्यामुळेच आज हा रेल्वे प्रकल्प साकार होण्याच्या मार्गावर आहे. याचे श्रेय केवळ आणि केवळ आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांना जाते. या जिल्ह्यावर यापूर्वी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी प्रदीर्घकाळ नेतृत्व केले आहे. राज्य सरकारमध्ये डॉक्टर पाटील यांचे मोठे प्रस्थ होते, शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्ती असल्यामुळे राजकारणामध्ये त्यांनी आपला कायम प्रभाव ठेवला. त्याचाच परिणाम पुढच्या काळात आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या कामामध्ये दिसून येतो. या गुढीपाडव्याच्या निमित्ताने रेल्वेची ही गोड बातमी सर्व जिल्ह्यातील जनतेसाठी तेवढी समाधानाची आणि आनंदाचे आणि मंगल वार्ता आहे. याशिवाय तुळजापूर येथे जिल्हा व सत्र न्यायालयासाठी मंजुरी, तुळजापूर येथील नवीन न्यायालय इमारत उभारणी,  नळदुर्ग ते अक्कलकोट या प्रदीर्घ कालावधीत रेंगाळलेल्या रस्त्यासाठी 105 कोटी निधी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या कडून प्राप्त केले आहेत. या रस्त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते विकासाला चालना मिळत असल्यामुळे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या कार्यकाळ मध्ये जनतेत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या विकासाच्या योजना निर्माण होण्यासाठी आराखडा तयार करणे आणि त्याला राज्य आणि केंद्र सरकारच्या समोर ठेवून प्रशासकीय मान्यता प्राप्त करणे ही अत्यंत किचकट आणि प्रशासकीय पातळीवर तेवढीच महत्त्वाचे असणारी कामगिरी आमदार राणा जगजितसह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित दादा पवार यांच्या माध्यमातून चालवली आहे. जिल्ह्याच्या कोणत्याही प्रश्नासाठी राणादादा मागे राहत नाहीत नेहमी प्रयत्न करणारा नेता अशी त्यांची ओळख आहे.

श्रेयवाद आणि सत्ताधारी विरोधक  अशा पातळीवर खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजित सिंह पाटील यांचे काही प्रसंगांमध्ये विशेषता प्रचाराच्या रणधुमाळी मध्ये एकमेकावर आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. परंतु हे मुद्दे तात्कालीक समजून आमदार राणा जगजितसह पाटील यांनी नेहमी विकास कामांचा पाठपुरावा करण्यासाठी जी बाजू लावून धरली आहे ती धाराशिव जिल्ह्यासाठी आणि धाराशिव जिल्ह्याच्या विकासात्मक मागासले पण दूर करण्याच्या उद्देशाने खूप मोठे काम आहे. या कामांमध्ये राणा दादा यांनी मिळवलेली यश निश्चितच धाराशिव जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि उपयुक्त आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांच्या पत्नी सौभाग्यवती अर्चनाताई पाटील या विराजमान झाल्या हा देखील विकास कामांचा पाठपुरावा करण्याच्या अनुषंगाने आणि केंद्र सरकार राज्य सरकार जिल्ह्याचे नेतृत्व आणि जिल्हा परिषदेचे नेतृत्व या विकास कामाच्या पाठपुरावा करण्याच्या साखळीसाठी तेवढेच महत्त्वाचे मोलाचे आणि गरजेचे आहे. खऱ्या अर्थाने अर्चनाताई जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होणे हे राणा दादांच्या विकासात्मक प्रयत्नांना पोस् देणारे आणि सर्व तालुक्यांमध्ये विकासाचे कामे झाली पाहिजेत या उद्देशाने राजकारण करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य न्याय देणारे ठरणार आहे.

राणा दादा यांना या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सौ अर्चनाताई पाटील यांचे अध्यक्ष पद खूप मोठी जिल्हा कडून यांची भेटच मिळाली आहे. अर्चनाताई पाटील यांची अध्यक्ष होण्याची जिद्द होती आणि राणा दादा यांचे प्रयत्न होते. सोबतचे कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद लढवणारे सर्व पदाधिकारी यांचे देखील समाधान अर्चनाताई पाटील अध्यक्ष झाल्यानंतर निश्चित झालेले आहे. या गुढीपाडव्याच्या निमित्ताने विकास कामांची ही गुढी कायम फडकत राहो आणि राणा दादा यांच्या प्रयत्नांना सदैव राज्य शासन केंद्र शासन सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व योजना लाभार्थी आणि अविकसित असणाऱ्या या जिल्ह्याच्या विकास कामांना बळ देणारे ठरवू हीच गुढीपाडव्याच्या या शुभ दिनी मनापासून हार्दिक  शुभेच्छा. डॉक्टर सतीश महामुनी पत्रकार तुळजापूर.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 5 3 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे