ई-पेपरक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र
धाराशिव जिल्ह्यातील युवा पत्रकार अनिल आगलावे यांना राज्यस्तरीय डॉ. पंजाबराव देशमुख राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
निस्वार्थ सामाजिक कार्य आणि पत्रकारितेच्या कामाची घेतली गेली नोंद, लवकर समारंभपूर्वक होणार अनिल आगलावे यांचा सन्मान

0
0
3
8
2
7
प्रदीर्घकाळ निस्वार्थ समाजसेवेचा सन्मान – प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपले
तुळजापूर दि ३० डॉ. सतीश महामुनी
धाराशिव जिल्ह्यामध्ये विविध संस्थांच्या माध्यमातून प्रदीर्घकाळ निस्वार्थ समाजसेवा नोंद घेऊन राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघ रायगड यांच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न राज्यस्तरीय पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अनिल आगलावे यांना घोषित झाला आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचा त्यांना परिश्र स्पर्श झाला असून यामधून त्यांनी खूप मोठी समाजसेवेची प्रेरणा देखील घेतलेली आहे या निमित्ताने त्यांच्या कन्या ममताताई सपकाळ यांनी आणि नागरावे यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
वंचित उपेक्षित दुर्लक्षित घटकांना त्यांची न्याय हक्क व संविधानिक अधिकार मिळवून देण्यासाठी प्रदीर्घ काळ आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून निस्वार्थ सामाजिक कार्य करणारे तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथील रहिवाशी तसेच पुजारी नगर फाउंडेशनचे संस्थापक, संस्कार भारती धाराशिव जिल्हा कार्यकारणी सदस्य, तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी, आमदार संवाद मंचाचे समन्वयक अनिल आगलावे यांना राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने २०२६ वर्षाचा मानाचा डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न राज्यस्तरीय पुरस्कार दिला जात आहे.
महाराष्ट्राची जडणघडण करण्यामध्ये ज्या विभूतींचा महत्त्वाचा मोलाचा वाटा आहे अशा पंक्ती मधील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय ओबीसी रत्न पुरस्कार धाराशिव जिल्ह्यातील सुपुत्राला मिळतो आहे हा सर्व धाराशिव जिल्ह्यातील जनतेसाठी आनंदाचा क्षण आहे. जात-पात न पाहता सर्व जाती धर्माच्या लोकांना समाजकार्य आणि पत्रकारितेच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची मोलाची आणि गरजेची मदत करणारे आणि लागणारे यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांनी आजपर्यंत ज्या वंचित दुर्लक्षित आणि गरजवंत घटकांना मदतीचा हात दिला आहे अशा सर्व उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांचा हा सन्मान मानला जात आहे.
पत्रकारितेच्या माध्यमातून नव्या पिढीची पत्रकारिता करणारा आघाडीचा युवा पत्रकार अशी त्यांची ओळख आहे. दैनिक सामना पुणे कार्यालयात त्यांनी काही वर्ष उपसंपादक या पदावर काम केल्यानंतर ते गतवर्षीपासून सोलापूर तरुण भारत चे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. तरुण भारत सोलापूर या वृत्तपत्राला मिळालेला हा पत्रकारितेचा दागिना आपल्या कामाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात आपला प्रभाव निर्माण करतो आहे. मराठी पत्रकारिता आणि इंग्रजी हिंदी पत्रकारिता अशा विविध पत्रकार त्याच्या पैलू वर आणि आगलावे यांचा विशेष अभ्यास आहे. तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथे जलसंधारणाचे खूप मोठे काम आमदार संवाद मंच या एनजीओ संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले येथे ४ हजार सीसीटीव्ही बंधारे बांधण्यात आले, या गावाच्या पाण्याच्या पातळीमध्ये दोन ते चार तासांनी वाढ करण्याची किमया बसवंतवाडी गावातील श्रमदान केलेल्या प्रत्येक माणसाच्या श्रमातून झाली ही कामगिरी करण्यामध्ये पत्रकार अनिल आगलावे यांचा मोलाचा वाटा आहे. शासन प्रशासन आणि लोकांना सोबत घेऊन त्यांनी धाराशिव जिल्ह्याच्या वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांना लोकांचा पाठिंबा मिळवून दिला आहे. अनेक क्षेत्रांमध्ये काम केल्यानंतर राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघ रायगड या संस्थेच्या वतीने त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन त्यांना 2020 वर्षाचा हा राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार दिला जात आहे यासंदर्भातील अधिकृत घोषणा संस्थेचे अध्यक्ष अनिल नाचपले, राज्य सचिव संतोष भोजने यांनी केली आहे. लवकरच हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार असून या निमित्ताने एका युवा पत्रकाराचा त्याच्या सामाजिक कार्याच्या अनुषंगाने होणारा हा खूप मोठा सन्मान मानला जातो आहे. श्री आगलावे यांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर देशातील प्रसिद्ध चित्रकार खाजाभाई सय्यद यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. पुजारी नगर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश पुजारी यांनी अनिल आगलावे यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
तुळजापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने श्रीकांत कदम प्रदीप अमृतराव सचिन ताकमोगे संजय खुरुद, शुभम कदम, सुरज बागल आणि ज्ञानेश्वर गवळी आदि पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. संस्कार भारतीच्या वतीने या यशाबद्दल डॉ. सतीश महामुनी, शेषनात वाघ, पद्माकर मोकाशी, जिल्हाध्यक्ष शामसुंदर भन्साळी, तुळजापूरच्या अध्यक्ष सौभाग्यवती अपर्णाताई शेटे आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केलेले आहे. आमदार संवाद मंच यांच्या वतीने मुंबई धाराशिव व तुळजापूर येथील पदाधिकाऱ्यांनी त्यांना संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
0
0
3
8
2
7



