क्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

लोककलावंत कृष्णाई उळेकर हिला मिळालेला पुरस्कार प्रभाकर उळेकर यांनी स्वीकारला

महाराष्ट्र शासनाच्या वतीने लोककलावंत कृष्णाई हिचा गुणगौरव

0 0 4 0 9 4

लोककलावंत कृष्णाई उळेकर ‘भारूड सम्राज्ञी’ पुरस्काराने सन्मानित

नागपूर/तुळजापूर १६ प्रतिनिधी

लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या सुप्रसिद्ध लोककलावंत कृष्णाई उळेकर यांना ‘भारूड सम्राज्ञी’ हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथील मूळ रहिवाशी असणारी भारुड कन्या कृष्णाई प्रभाकरराव उळेकर हिचा राज्य शासनाच्या वतीने राज्य युवा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या निमित्ताने तिचा आरळी बुद्रुक येथे सत्कार करण्यात आला.

डॉ. प्रशांत गायकवाड – गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, तक्षशिला विद्वत्ता समितीचे ब्रँड अँबेसेडर तथा ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अभियानाचे प्रणेते – यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. तसेच महाराष्ट्र टाईम्स, नागपूरचे संपादक श्री. अभिषेक खुले यांनी आवर्जून कृष्णाई उळेकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सन्मान केला.

कार्यक्रमाच्या वेळी कृष्णाई उळेकर उपलब्ध नसल्याने त्यांच्या वतीने पंचायत समिती सदस्या सौ. सोनालीताई डोंगरे व बालिश काका डोंगरे, कृष्णाई च पिताश्री प्रभाकर उळेकर यांनी हा सन्मान स्वीकारला.

गेली १४ वर्षे ‘रंग भारुडाचे, वारी लोककलेची’ या कार्यक्रमातून कृष्णाई उळेकर महाराष्ट्राची लोककला, संस्कृती व सामाजिक विषय भारुडाच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर करतात. आजवर त्यांनी ६५० हून अधिक प्रयोग सादर केले आहेत. शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठीही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘राज्य युवा पुरस्कार २०१७ ने सन्मानित केले आहे.

यावेळी बोलताना डॉ. प्रशांत गायकवाड म्हणाले, “कृष्णाई उळेकर यांनी लोककलेच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती जिवंत ठेवली आहे. त्यांचे कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.” संपादक अभिषेक खुले यांनीही कृष्णाई यांच्या कलेला व सामाजिक योगदानाला शुभेच्छा दिल्या

*फोटो कॅप्शन*:
डॉ. प्रशांत गायकवाड व संपादक अभिषेक खुले यांच्या हस्ते ‘भारूड सम्राज्ञी’ पुरस्कार कृष्णाई उळेकर यांच्या वतीने सोनालीताई डोंगरे व बालिश काका डोंगरे. प्रभाकर उळेकर यांनी स्वीकारताना.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे