क्रिडा व मनोरंजन

राज कंपनी तरुण मंडळ अध्यक्षपदी गोविंद पेंदे सचिव मारुती कने यांची निवड

उपाध्यक्षपदी मंगेश साळुंखे सन्मानित, २०२६ गणेशोत्सव भरगच्च कार्यक्रम जाहीर

0 0 4 0 9 4

राजा कंपनी तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी गोविंद पेंदे यांची निवड

तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजापूर शहरातील शुक्रवार पेठ येथील ‘श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती राजा कंपनी तरुण अध्यक्षपदी गोविंद पेंदे यांची निवड झाली. सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचे संस्थापक अध्यक्ष सज्जनराव साळुंखे यांनी अभिनंदन केले आहे.

मंडळाचे आधारस्तंभ सज्जनराव साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बैठकीचे अध्यक्ष विजय झाडपिडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी गोविंद  पेदे, उपाध्यक्षपदी मंगेश साळुंके, कोषाध्यक्षपदी शुभम गाजरे, सहकोषाध्यक्षपदी हरीष साळुंके, सचिवपदी मारुती कणे, सहसचिवपदी कृष्णा जाधव तर सोशल मीडिया प्रमुखपदी ओम साळुंके यांची निवड करण्यात आली.

यावेळी मंडळाचे ज्येष्ठ सभासद व नगरसेवक माऊली भोसले, माजी अध्यक्ष गणेश साळुंके, सुभाष भोसले, दादा साळुंके, काका गरड, जयराज भोसले, बाळासाहेब टोले, विकी भोसले यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने संस्थापक अध्यक्ष सज्जनराव साळुंखे यांनी सर्व नूतन पदाधिकारी यांचे अभिनंदन केले हा गणेशोत्सव सामाजिक बांधिलकी ठेवून अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतो पावणारा गणपती हा खऱ्या अर्थाने सर्व गावाचा गणपती झालेला आहे कारण प्रत्येक वर्षभर चतुर्थीला गावाच्या कानाकोपऱ्यातून लोक दर्शनासाठी आणि आरतीसाठी येतात खऱ्या अर्थाने हा पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये लोकप्रिय झाला आहे शहरवासीय आणि देवीच्या दर्शनासाठी आलेले भक्त खूप मोठ्या संख्येन या गणपतीच्या दर्शनासाठी आलेले असतात खऱ्या अर्थाने राजा कंपनी तरुण मंडळांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून शहरांमध्ये सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आपण अभिनंदन करतो असे गौरव पर उद्गार संस्थापक अध्यक्ष सज्जनराव साळुंखे यांनी काढले. पत्रकार डॉक्टर सतीश महामुनी तुळजापूर.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे