ई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्र
राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर तेर धाराशिव माहेरवाशीण सुनेत्रा वहिनी विराजमान
सतीश दंडनाईक यांची सकारात्मक प्रतिक्रिया, महत्त्वाची आणि मोलाची

0
0
1
8
1
2
धाराशिवला जिल्ह्याला अभिमान वाटला…
महायुतीमध्ये समन्वय असल्यामुळे हे सगळे तातडीचे राजकारण आणि उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारण्याची प्रक्रिया पार पडली, भाजपाचा स्पर्श असणाऱ्या कोणत्याही कामाला चांगले म्हणण्याचा मोठेपणा आज कोणामध्ये शिल्लक आहे हे दुर्बिणीने पहावे लागते आहे म्हणून….
.धाराशिव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी सतीश दंडनाईक यांनी फेसबुक या समाज माध्यमावर राज्याच्या आजच उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारलेल्या सुनेत्राताई अजितददा पवार यांच्या तातडीने पदभार स्वीकारण्याच्या घटनेवर अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवली. लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे कोणीही दिवसभर आपल्या मताप्रमाणे आपल्या विचाराप्रमाणे कोणालातरी पाण्यात पाहण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या पोस्ट करीत असताना तुमची पोस्ट मात्र धाराशिव जिल्ह्याला साजेशी आणि सुनेत्राताई यांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देणारी वाटली.
कुणी काहीही म्हणो –
कुणाला वाटेल घाई झाली, टीका होईल,
ज्याचा काही संबंध नाही ते तोंडाला येईल ते बरळतील,
पण महाराष्ट्राच्या इतिहासातला महत्वाचा निर्णय आहे. खंबीर निर्णय आहे. आणि कौतुकास्पद आहे.
हे खानदानी बाईचं लक्षण आहे. अश्या खंबीर प्रसंगात योग्य निर्णय घेऊन कार्यकर्त्यांना, पक्षाला, राज्याला, कुटुंबाला सावरणं आवश्यक आहे. आणि खऱ्या अर्थाने धर्मपत्नी, अर्धांगिनी हे कर्तव्य त्यांनी निभावलं आहे.
3 दिवसात उपमुख्यमंत्री पदाची घाई म्हणून ज्यांना वाईट वाटत आहे त्यांनी समजून घ्या..
उत्तराधिकारी तात्काळ नेमला नाही तर पक्षांतर्गत फूट, गटबाजी, बंडखोरी ही होणारच..
त्यात गिधाडं दादांच्या कुटुंबाच्या वाईटावर टपलेली आहेत!
कित्येक सत्ता, साम्राज्य नेता उशिरा नेमल्याने लयाला गेलेली आहेत.
फडणवीस शिंदे हे दोन भाऊ या बहिणीला जीवापाड जपतील. महाराष्ट्र अजित दादांच्या स्पीडने वाढता असेल, चेहरा भले सुनेत्रा पवार असेल, पण त्यांच्यामागे अजित दादांचा आत्मा पाठबळ बनून राहील.
आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांचे सहकारी सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते पदाधिकारी सतीश दंडनाईक यांनी या भावना आपल्या समाज माध्यमावर व्यक्त केले आहेत दिवसभर शपथविधी घेण्यावरून उलट सुलट चर्चा सुरू असताना आपल्याच धाराशिव जिल्ह्यामधून दादांचे निकटवर्तीय सहकारी सतीश दंडनाईक यांनी केलेली ही पोस्ट जिल्ह्याचा सकारात्मक प्रतिसाद सांगणारी वाटली. राजकारण आज एवढ्या खालच्या स्तरावर पोहोचले आहे की कोणीही उठतो आणि समाज माध्यमावरून काहीही मत व्यक्त करतो. वयाचे भान राहिली आहे ना विचारांचे भान हा खालावलेला स्तर केव्हा सुधारेल हे सांगता येत नाही परंतु सतीश जी आपण मात्र सकारात्मक पोस्ट करून रात्री उशिरा आपली ही पोस्ट पहायला मिळाली. खऱ्या अर्थाने या तातडीने घेतलेल्या भूमिकेवर आणि दिवसभरातील घडामोडी वर तुमच्या पोस्टने समाधान व्यक्त करायला भाग पाडलं. ( डॉक्टर सतीश महामुनी पत्रकार तुळजापूर तथा अध्यक्ष तुळजापूर तालुका पत्रकार संघ )
0
0
1
8
1
2



