ई-पेपरकृषीवार्ता

पंचायत समितीच्या राजकारणावर जिल्हाभर महायुती व आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचे वर्चस्व

पाचही जिल्हा परिषदेवर महायुती, तुळजापूर सभापतीपद विक्रम देशमुख यांच्याकडे

0 0 3 5 3 8

जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचे कष्ट याच्या जोरावर संबंध जिल्ह्यात महायुतीने विश्वास संपादन करून सत्ता मिळवली – आमदार राणा जगजितसिंह पाटील

धाराशिव दिनांक ६ डॉ सतीश महामुनी

धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात यापूर्वी डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि त्यानंतर आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे, जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी मागील अनेक वर्षांमध्ये सर्व तालुक्यात आपला जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची जाळे भक्कम केल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये महायुतीला मोठे यश प्राप्त झाले आहे. वादविवाद न करता सकारात्मक राजकारण करणारे आमदारांना जगजितसिंह पाटील यांच्या पाठीमागे कार्यकर्त्यांची मोठी फौज निर्माण झाल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ग्रामीण क्षेत्रावर संपूर्णतः आमदारांना जगजीत सिंह पाटील यांनी आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले आहे.

एका बाजूला माजी मंत्री बसवराज पाटील दुसऱ्या बाजूला माजी मंत्री तानाजी सावंत आणि तिसऱ्या बाजूला विरोधक म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर या सर्वांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हा परिषदेवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले परंतु बाजी मारली ती राहणार जगजीत सिंह पाटील आणि सौ अर्चनाताई पाटील यांनी. निवडणुकीच्या अगोदरच महायुतीकडून सौ अर्चनाताई पाटील याच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होतील असे जाहीर केलेले होते त्यामुळे या विधानाला आणि पाटील कुटुंबाला अनेकांनी विरोध केला. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून विरोधकांनी राणा दादा यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु अखेरपर्यंत या सर्वांना यश प्राप्त झाले नाही येणाऱ्या १३ तारखेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर या सर्व पडद्यामागील राजकारणाला पूर्णविराम मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्याच्या विकासात्मक वाटचालीमध्ये आमदार राणा दादा यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकल्पांना साकार करण्यासाठी आराखडे तयार करणे आणि त्याचे मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न चालवलेले आहेत . विरोधकांनी याच्यावर केलेली टीका याला दुर्लक्ष करून आमदार पाटील यांनी आपल्या शासकीय योजना जिल्ह्यामध्ये राबवण्याच्या प्रयत्नाचा पाठपुरावा सुरू केलेला आहे या योजना आणि त्याचा पाठपुरावा यासंदर्भात त्यांनी कार्यकर्त्यांची मानसिकता निर्माण केल्यामुळे सर्व तालुक्यांमध्ये होणाऱ्या विकास कामावर जनतेने विश्वास व्यक्त केलेला आहे.

 धाराशिव ,तुळजापूर आणि कळंब पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आपले राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत महायुतीने मुसंडी मारत तिन्ही ठिकाणी विजय मिळवला असून, या विजयामुळे जिल्ह्यात आमदार पाटील यांची पकड अधिक घट्ट असून जिल्ह्याच्या राजकारणावर आजही पाटील कुटुंबाचा पकडा आहे हेच यावरून सिद्ध होत आहे.

​कळंब पंचायत समितीची निवडणूक सर्वाधिक लक्षवेधी ठरली. येथे महायुती आणि महाविकास आघाडीचे संख्याबळ समसमान (टाय) झाल्याने मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. दोन्ही बाजूंनी सभापती आणि उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केल्यामुळे पेच निर्माण झाला होता. अखेर निवडणूक नियमानुसार ईश्वरचिठ्ठी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या नशिबाच्या खेळातही महायुती सरस ठरली आणि दोन्ही पदे महायुतीच्या झोळीत पडली. ​केवळ धाराशिव, कळंब आणि तुळजापूरच नव्हे, तर उमरगा आणि लोहारा पंचायत समितीवरही महायुतीने निर्विवाद बहुमत मिळवत आपला झेंडा फडकवला आहे.

तुळजापूरमध्ये कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेत महायुतीच्या उमेदवारांनी विजयोत्सव साजरा केला. ​हा विजय जनतेच्या विश्वासाचा आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाचा आहे. नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींनी जनसेवेला प्राधान्य देऊन तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहावे असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. ​आमदार पाटील यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून ठिकठिकाणी गुलाल उधळून जल्लोष करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 5 3 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे