
0
0
1
8
1
2
अजितदादांच्या आठवणी आणि सहवास आयुष्यभर स्मरणात राहील – आमदार राणा जगजितसिंह पाटील
तुळजापूर दिनांक ४ डॉक्टर सतीश महामुनी
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्याचे जावई आपल्या आत्याचे पती राज्यातील दमदार नेते अजित दादा पवार यांच्या आकस्मित विमान अपघातात झालेल्या निधनाने मन हेलावून केले आहे, त्यांचा सहवास आणि त्यांच्या आठवणीने मनामध्ये काहूर माजवले आहे. दादांचा हा सहवास आयुष्यभर स्मरणात राहील संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा देणारे हे व्यक्तिमत्व केल्यामुळे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पोरका झाला आहे अशा शब्दात आमदार राणा जगजितसह पाटील यांनी आपले मन मोकळे केले.
उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी सहा वेळा शपथविधी घेतला प्रदीर्घकाळ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी यशस्वीपणे काम केले उद्योग आणि सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं विशेष काम आहे शहरांच्या विकासामध्ये देखील त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष घालून पिंपरी चिंचवड आणि इतर शहरांमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणला विकासाचा कायम ध्यास आणि नवनिर्मिती करण्याचा त्यांचा स्वभाव यामुळे अजितदादा नेहमीच इतर राजकारण्यापेक्षा वेगळे वाटतात. अजित दादा या विमान अपघाताच्या आपत्तीमधून बाहेर पडले असते तर सगळ्यांनाच आनंद झाल असता परंतु नियतीने ते केले नाही याचे खूप दुःख आहे. सुनेत्रा आत्या उपमुख्यमंत्री झाल्यामुळे अजित दादांच्या काही आठवणी निश्चितच महाराष्ट्राच्या समोर राहणार आहेत. त्यांच्या माध्यमातून लोकांना अजितदादा दिसणारच आहेत. अजित दादा वर प्रेम करणारे लाखो समर्थक कार्यकर्ते आणि देशभरामधील जगभरातील मराठी माणूस आहे.
जगामधील सर्वच मराठी माणूस अजित दादांच्या कामाचे कौतुक करतात. महाराष्ट्राच्या उद्योग आणि कृषी व सहकार क्षेत्रावर अजितदादांचे विशेष लक्ष होते. पुढील दहा वर्षाचा काळ अजितदादाा साठी पर्यायाने महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. महायुतीच्या सरकारमध्ये अजित दादांचे जे महत्त्व होते ते आधुनिकीत करण्यासारखे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यामध्ये जो राजकीय समन्वय निर्माण झाला होता त्यामधून निश्चितच महाराष्ट्राला आगामी काळामध्ये खूप चांगले दिवस दाखविण्याचे त्यांचे स्वप्न होते. अजितदादा नेहमी विकासाच्या प्रकल्पाला पाठबळ देणारी नेतृत्व असल्यामुळे सरकारचे देखील त्याच अनुषंगाने काम सुरू आहे. देशभरामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकारच्या माध्यमातून मोठमोठे विकास प्रकल्प रस्ते प्रकल्प मंदिर विकास शहरांचा विकास ग्रामीण भागाच्या पायाभूत सुविधांचा विकास कृषी क्षेत्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी मूल्य वाढविण्यासाठीचे प्रयत्न. प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योग वाढावा यासाठी केंद्र सरकारने या अर्थसंकल्पामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत या पाहता निश्चितच येणारा काळा विकासाचा त्याचबरोबर गतिमान विकासाचा काळ आहे यामध्ये पुढच्या काळामध्ये प्रत्यक्ष अजित दादांचा सहभाग दिसणार नाही परंतु सुनेत्रा आत्यांच्या माध्यमातून अजित दादांचे स्वप्न निश्चित साकार होईल अशा प्रकारची अपेक्षा आहेत असे देखील या निमित्ताने आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी स्पष्ट केले.
अजित दादा सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काम करणारे नेते त्यामुळे त्यांचे समर्थन खूप मोठे आहे अजित दादांचे राजकीय अंदाज देखील कधी चुकले नाहीत. धाराशिव जिल्ह्यासाठी अजित दादा आपल्यामध्ये नसणे अत्यंत खेदजनक आणि दुःखदायक आहेत हे दुःख आजही मनामध्ये आहे. सहन होणार नाहीत अशा वेदना या काळात झालेले आहेत. पवार परिवारावर पर्यायाने महाराष्ट्र राज्यावर खूप मोठे संकट या निमित्ताने आलेले आहे. आई तुळजाभवानी आणि गोरोबाकाका यांच्या चरणी एवढेच प्रार्थना आहे की सुनेत्रा वहिनी आणि संपूर्ण पवार कुटुंबाला या संकटातून सावरण्याची शक्ती दे. अशा भावपूर्ण शब्दांमध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष सौ अर्चनाताई पाटील यांनी तेरच्या नदीमध्ये अजित दादांच्या अस्थींचे जड अंतकरणाने विसर्जन केले. यावेळी अजित ददा अमर रहे अजित दादा अमर रहे अशा घोषणांनी तेर दणाणून निघाले. ( डॉक्टर सतीश महामुनी तुळजापूर ९८९००२४९१०)
0
0
1
8
1
2


