ई-पेपरनोकरी

माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा तुळजापुरात वाढदिवस साजरा, ते कष्टाचे दिवस होते म्हणून आज देशात आणि राज्यात भाजपशासित राज्य निर्माण झाले आहे – प्रदेश सदस्य गुलचंद व्यवहारे

तुळजाभवानी देवीच्या महाद्वारासमोर झाली महाआरती

0 0 2 6 6 1

माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा तुळजापुरात वाढदिवस साजरा, ते कष्टाचे दिवस होते म्हणून आज देशात आणि राज्यात भाजपशासित राज्य निर्माण झाले आहे – प्रदेश सदस्य गुलचंद व्यवहारे

तुळजापूर दिनांक २१ डॉ सतीश महामुनी

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे काम वाढवण्यामध्ये आमच्या सर्वांचे  लाडके नेते मार्गदर्शक पक्षाचे माजी सरचिटणीस व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब यांचे खूप मोठे योगदान आहे, हाच पक्षाचे ट्रिपल इंजिन सरकार निश्चितच जन माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या कल्याणाचे काम करीत आहे असे गौरव उद्गार भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य गुलचंद व्यवहारे यांनी काढले.

भारतीय जनता पार्टीच सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुळजाभवानी देवीच्या महाद्वारासमोर महाआरती करण्यात आली त्याद्वारे माजी आमदार ठाकूर यांना सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभकामना देण्यात आल्या. या ठिकाणी भाविक भक्तांना वाढदिवसाच्या निमित्ताने लाडूचे वितरण पक्षाच्या कार्यकर्त्याच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त करताना प्रदेश भाजप सदस्य गुलचंद व्यवहारे यांनी माजी आमदार ठाकूर यांच्या बरोबर काम करताना आलेले अनुभव अगदी सहजपणे बोलून दाखवले. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना ठाकूर साहेब यांनी कष्टाचे काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो नारा दिला आहे सबका साथ सबका विकास या धोरणाप्रमाणे भाजपा महाराष्ट्र मध्ये कायम कार्यरत राहणार आहे असेही या निमित्ताने श्री व्यवहारे यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेश सरचिटणीस माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुळजापुरात तुळजाभवानी देवीच्या महाद्वारासमोर देवीची सामुदायिक आरती करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रदेश भाजप सदस्य गुलचंद व्यवहारे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोधले, जिल्हा कोषाध्यक्ष नागेश नाईक, इंद्रजीत साळुंखे, प्रसाद पानपुडे, शांताराम पेंदे, अजीत अमृतराव, अण्णा क्षीरसागर, सागर पारडे, राजाभाऊ मलबा, आप्पा पवार ,विलास पारडे यांच्यासह इतर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, भाविक ,यावेळी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे