ई-पेपरनोकरी

लता मंगेशकर यांच्या अविट गोडीच्या गाण्यांचा पुन:प्रत्यय- पूना गेस्ट हाऊस आयोजित ‘कुछ दिलने कहा’ सांगीतिक कार्यक्रम

लता मंगेश कर यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘कुछ दिलने कहा...’

0 0 2 6 6 1

पुणे : गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘मोगरा फुलला’, ‘संधीकाली या अशा’, ‘तू मेरे सामने’, ‘नैना बरसे’ या आणि अशा विविध अविट गोडीच्या गाण्यांचा रसिकांना आज पुन:प्रत्यय आला.

निमित्त होते लता मंगेश कर यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘कुछ दिलने कहा…’ या मराठी-हिंदी गीतांच्या सादरीकरणाचे. पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे आज (दि.९) या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन पूना गेस्ट हाऊस येथे करण्यात आले होते. सुप्रसिद्ध गायिका अनुजा पंडित आणि सुप्रसिद्ध गायक धनंजय पवार यांनी विविध चित्रपटांमधील गीतांचे सुरेल सादरीकरण केले तर सुप्रसिद्ध निवेदक सिद्धार्थ बेंद्रे यांनी चित्रपट सृष्टीतील अनेक किस्से सांगत, कलाकारांसंदर्भातील आठवणींना उजाळा देत कार्यक्रम खुलवत नेला. सुप्रसिद्ध गायिका अंजली मराठे, स्वाती शहा, आनंद सराफ, ज्योत्स्ना सरशपांडे, प्रमोद पुंगलिया, माधुरी कासट, मोना भोरे, प्रसाद पिंपळखरे, सतीश मराठे, तालेरा ग्रुपच्या संचालिका श्रीमती तालेरा यांची प्रमुख उपस्थिती होती. कलाकार आणि मान्यवरांचे स्वागत पूना गेस्ट हाऊसचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार यांनी तर प्रास्ताविक अजित कुमठेकर यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात लता मंगेशकर यांच्यावर रचलेल्या काव्याने झाली. त्यानंतर ‘ओम नमो जी आद्या’, ‘चिंब पावसानं’, ‘इस दुनिया मे जिना हो तो’, ‘इतना ना मुझसे तू’, ‘रिमझिमके गीत सावन’, ‘कुछ दिलने कहाँ’, ‘तू मेरे सामने’, ‘ये आँखे देखकर’, ‘अखेरचा हा तुला’ अशी गत काळात रिझविणारी गीते सादर करण्यात आली. सादरीकरणाला रसिकांची मिळणारी दाद कलाकारांचा उत्साह वाढविणारी ठरली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे