गुन्हेगारी
तुळजापुरात दोन गटात झालेल्या वादावादी मध्ये गोळीबार
दीड महिन्याच्या कालावधीत ही दुसरा गोळीबाराची घटना

0
0
2
6
6
1
तुळजापुरात पुन्हा गोळीबार, दोन तरुणांना अटक
तुळजापूर दिनांक 8 प्रतिनिधी
तुळजापूर येथे किरकोळ कारणावरून धाराशिव रोडवरील एका हॉटेल समोर गोळीबार झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संदर्भात विभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांनी सांगितले की, सात तारखेला रात्री च्या सुमारास ही किरकोळ वादावादीची घटना घडली आणि यामध्ये गोळीबार करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ ठिकाणी भेट देऊन संबंधित दोन तरुणांना ताब्यात घेतले आहेत याप्रकरणी गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे.
नगरपालिका निवडणूक निकाल दरम्यान तुळजापुरात दोन गटात झालेल्या वादावादी मध्ये गोळीबार करण्यात आला होता त्यानंतर दीड महिन्याच्या कालावधीत ही दुसरा गोळीबाराची घटना घडली आहे. या प्रकाराची पोलिसांनी गंभीर नोंद घेतली असून दोन लोकांना ताब्यात घेऊन पोलीस तपास केला जात आहे अशी माहिती विभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांनी दिली आहे. दरम्यान या घटनेची तुळजापुरात जोरदार चर्चा आहे.
0
0
2
6
6
1