ई-पेपर
लिट्ल फ्लॉवर्स मराठी प्राथमिक शाळा तुळजापूर येथे छत्रपती शिवजयंती उत्साहात साजरी
विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग, शिवरायांचा जयजयकार

0
0
2
6
6
1
लिट्ल फ्लॉवर्स मराठी प्राथमिक शाळा तुळजापूर येथे छत्रपती शिवजयंती उत्साहात साजरी
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत स्वराज्य निर्माते स्फूर्तीचा जिवंत झरा .पराक्रमाची लखलखती तलवार. शौर्य, धैर्य ,निष्ठा त्याग, या गुणांची साक्षातमुर्ति. जनकल्याण, सामाजिक समतेचे पुरस्कर्ते ,पर्यावरण प्रेमी ,स्त्रियांचे कैवारी ,अष्टावधानी, दुर्जनांचे कर्दनकाळ, सज्जनांचे कैवारी, निश्चयाचे महामेरू असे महान युगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लिट्ल फ्लॉवर्स मराठी प्राथमिक शाळा तुळजापूर येथे साजरी करण्यात आली. शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक संजय पवार, अविनाश गव्हाणे व उमा पोतदार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. सर्व शिक्षक बांधवांनी शिवरायांना विनम्र अभिवादन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख शिवाजी कारंडे व सुनिता शिंदे यांनी परिश्रम घेतले.
0
0
2
6
6
1



