आरोग्य व शिक्षण
महामाता रमाई महोत्सव २ फेब्रुवारीपासून
रिपब्लिकन जनशक्ती प्रदेशाध्यक्ष शैलेश मोरे यांचा रामजीबाबा आंबेडकर स्मृती पुरस्काराने गौरव
0
0
1
8
1
2
पुणे : महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय समितीतर्फे सोमवार, दि. २ फेब्रुवारी ते शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महामाता रमाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सव सायंकाळी ६ ते ८ या कलावधीत महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, वाडिया कॉलेज समोर येथे आयोजित करण्यात आला आहे.
रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर तर कार्याध्यक्ष सचिन ईटकर असून स्वागताध्यक्ष लता राजगुरू आहेत, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक विठ्ठल गायकवाड यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
महोत्सवाचे उद्घाटन दि. २ रोजी ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार असून महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या उषा कोलते आणि रिपब्लिकन जनशक्ती प्रदेशाध्यक्ष शैलेश मोरे यांचा रामजीबाबा आंबेडकर स्मृती पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
दि. ३ रोजी लॉर्ड बुद्धा आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे मुख्य संयोजक डॉ. गौतम बेंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘होय आम्ही उद्योजक होणारच’ या विषयावर वाडिया कॉलेजचे प्राचार्या डॉ. वृषाली रणधीर यांचे व्याख्यान होणार आहे. दि. ४ रोजी ज्येष्ठ एकपात्री कलावंत बण्डा जोशी यांचा ‘हास्यपंचमी’ हा कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला असून ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दि. ५ रोजी आडकर फौंडेशनाच्या सहकार्याने साहित्य सम्राट पुणेतर्फे रमाईंच्या लेकरांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून लोकशाहीर भगवान धिंडे सादरकर्ते आहेत. ॲड. अभय छाजेड, ज्ञानेश्वर मोळक, प्रशांत म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दि. ७ रोजी सकाळी ११ वाजता रमाईरत्न पुरस्कार वितरण आणि महोत्सवाचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. दीपक पायगुडे आणि लताताई राजगुरू यांचा रमाईरत्न पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे अध्यक्षस्थानी असणार असून परशुराम वाडेकर, धनराज तावडे, वसंत बोले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
0
0
1
8
1
2