ई-पेपर
कनिष्ठ महाविद्यालयीन प्रश्नासाठी शिक्षक होण्याच्या रस्त्यावर, राज्यातील शिक्षकांचा विराट मोर्चा
पुण्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा, संच मान्यतेच्या अटीपूर्वीच्या चालू ठेवा

0
0
3
5
3
8
कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचा ११ मे रोजी पुण्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा
तुळजापूर दि ८ प्रतिनिधी डॉ सतीश महामुनी
कनिष्ठ महाविद्यालय संच मान्यतेचे निकष पूर्वीप्रमाणे चालू ठेवावे यासह इतर मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने हजारो शिक्षकांचा विराट मोर्चा पुण्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयावर काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश नन्नवरे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय महासंघाचे राज्य अध्यक्ष डॉ. संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत त्यानुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश नन्नवरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्राध्यापकांचे विचार विनिमय बैठक संपन्न होऊन ११मे रोजी मोर्चा सहभागी होण्याचा निर्णय झाला.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या एकूणच प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यावर परिणाम करणाऱ्या निर्णय शासन घेत असून यामध्ये संच मान्यता मागील पन्नास वर्षापासून ज्या पद्धतीने सुरू आहे तीच पद्धत रास्ता असून ती बदलू नये अशी महासंघाची मागणी आहे, या संच मान्यतेच्या निर्णयावर शिक्षकांचे भवितव्य अवलंबून आहे, २० वर्षापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वर्गाच्या पटावर घेतले जावे कारण त्यांचा प्रवेश होत असेल तर त्यांना पटावर देखील घेतलेच पाहिजे, विज्ञान प्रात्यक्षिक साठी २० ऐवजी ४० विद्यार्थ्यांची तुकडी देखील अन्यायकारक आहेत ती पूर्वीप्रमाणे असावी, वर्ग तासिकेचा वेळ ४५ मिनिटे असावा तो कमी करू नये, आधार व्हॅलिडीटी चे काम शिक्षक वर्ग प्रामाणिकपणे करीत असताना तांत्रिक कारणाने न होणारे व्हॅलिटेशन ग्राह्य समजण्यात यावे अशा प्रमुख मागण्यासाठी हा विराट मोर्चा पुण्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयावर अकरा मे रोजी सकाळी 11 वाजता काढला जाणार आहे यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रा रमेश ननवरे व सरचिटणीस प्रा.प्रशांत भागवत यांनी केले आहे.
0
0
3
5
3
8



