तुळजापुरात 13 एप्रिल रोजी कै. दिगंबरराव कावरे रक्तदान शिबिर आयोजन
तुळजापूर दि 8 प्रतिनिधी
तुळजापूरच्या युवा स्पंदन सामाजिक संस्थेच्या वतीने सोलापूर येथील हेडगेवार रक्तपेढीच्या मदतीने रक्त संकलनाचे प्रचंड मोठे काम करून तुळजापुरला रक्त संकलन क्षेत्रामध्ये मोठा लौकिक प्राप्त करून दिला आहे, संस्थापक अध्यक्ष महेंद्र कावरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी गेल्या 22 वर्षापासून रक्त संकलनाचा हा उपक्रम सुरू ठेवल्यामुळे तुळजापूर येथे अडचणीत सापडलेल्या रुग्णांना रक्त मिळण्यासाठी मोठी मदत होते. यावर्षी 13 एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आव्हान संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
कै. दिगंबरराव कावरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने युवा स्पंदन सामाजिक संस्थेच्या वतीने सोमवार १३ एप्रिल २०२६ वेळ दुपारी ५:०० ते रात्री ८:३० क्रांती लॉज भवानी रोड तुळजापूर रक्तदान शिबिराच्या आयोजन केले आहे यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या वतीने हेडगेवार रक्तपेढीचे संचालक तथा संस्थापक अध्यक्ष महेंद्र कावरे यांनी केले आहे.
गेल्या ३१ वर्षाच्या कालखंडामध्ये युवास बद्दल संस्थेच्या वतीने घेण्यात येणारे रक्तदान शिबिर यावर्षी आयोजित आहे. तुळजापूर हे रक्तदान चळवळीचे केंद्र बनले आहे मराठवाड्यातील एका तालुक्यातून वर्षाला सर्वाधिक रक्तसंकलनाचा विक्रम या संस्थेच्या माध्यमातून तुळजापूर नोंदवला आहे. कै. दिगंबर किसनराव कावरे यांच्या २२ व्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन १३ एप्रिल २०२६ रोजी केले असून सदरील शिबिरात ऐच्छिक रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करावे अध्यक्ष महेंद्र कावरे यांनी केले आहे.