ई-पेपरमहाराष्ट्र

शिवसेना नेते सचिन अहिर यांचे तुळजाभवानी दर्शन

मंदिर संस्थांच्या वतीने सत्कार

0 0 4 0 0 8

नूतन विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांनी सहकुटुंब घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन

​तुळजापूर दि १३ प्रतिनिधी

विधान परिषदेचे नूतन उपसभापती सचिनजी अहिर यांनी आज ऐतिहासिक व तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेचे सहकुटुंब दर्शन घेतले. उपसभापती पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी आदिशक्तीच्या चरणी लीन होऊन कुलधर्म कुलाचार पार पाडला.
​तुळजापूर नगरीत आगमन झाल्यानंतर मंदिर प्रशासनाच्या वतीने आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर सचिन अहिर यांनी पत्नी आणि कुटुंबासह श्री तुळजाभवानी मातेची विधीवत दर्शन व पूजा-आरती केली.
​याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना सचिन अहिर म्हणाले, “महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता ही आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान आहे. या सर्वोच्च पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर मातेचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि कुटुंबाचा पारंपरिक कुलधर्म कुलाचार करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. महाराष्ट्रातील जनतेला सुख, समृद्धी लाभो आणि शेतकरी-कष्टकऱ्यांचे जीवन सुजलाम सुफलाम होवो, अशीच प्रार्थना मी मातेच्या चरणी केली आहे.”
​या दर्शनादरम्यान त्यांच्यासोबत नगराध्यक्ष विनोद गंगणे,शिवसेनेचे माजी जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम,ऋषीकेश मगर,सचिन रोचकरी, आबासाहेब कंदले,विशाल रोचकरी,औदुंबर कदम,मधुकर शेळके,शशिकांत पाटील,पोलीस प्रशासनाचे व मंदिरचे अधिकारी,शिवसेना पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. उपसभापतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे