ई-पेपरमहाराष्ट्रसंपादकीय

धाराशिव जिल्ह्यावर आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व, राज्य सरकारमध्ये राणा दादा यांची मोठी ताकद

धाराशिव जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून राणा दादा यांना लोकमान्यता, इतर पक्षावरही प्रभाव

0 0 3 5 3 8

धाराशिव जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला, राज्यपातळीवर राणा दादा यांच्याकडे मोठी जबाबदारी

तुळजापूर दिनांक 17 डॉक्टर सतीश महामुनी

राज्यामध्ये महायुतीने ज्याप्रमाणे नगरपरिषद महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्राप्त केले आहे त्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या सर्व निवडणुकीत महायुतीने आपला प्रभाव दाखवला आहे यामध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जिल्ह्यामध्ये यश प्राप्त करताना आपल्या नेतृत्वाला सिद्ध करून दाखवले आहे.

राज्यपातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री  सुनिता वहिनी अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने सर्व निवडणुकांमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. केंद्रामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जोडीने महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये प्रचंड विश्वास प्राप्त केला आहे. राज्यांमधल विरोधकांनी अनेक आरोप करून देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या यशाबद्दल सतत प्रसारमाध्यमांमध्ये साशंकता व्यक्त केली आहे. कधी निवडणूक आयोगावर आरोप तर कधी मशीन मॅनेज करण्यावरून आरोप प्रत्यारोप. सर्वत्र पैशाचा वापर केल्याचा आरोप हा आरोप काँग्रेस आणि शरद पवार गट राष्ट्रवादी उद्धव ठाकरे गट शिवसेना यांच्याकडून करण्यात आला. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम यांच्याकडून देखील भारतीय जनता पार्टीच्या या रणनीतीचा राजकीय स्वीकार केलेला नाही उलट अनेक दोष दाखविण्यातच राजकारणात या पक्षांनी धन्यता मानली आहे. तशीच परिस्थिती धाराशिव जिल्ह्यात देखील आहे सर्वजण आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. विरोधक खासदार ओमराजे निंबाळकर आपल्या वडिलांचे हत्या प्रकरण काढून आमदार पाटील यांना सतत लक्ष करून पातळी सोडून टीका करतात.

तानाजी सावंत आणि बसवराज पाटील हे दोन महायुती मधील बडे नेते या जिल्ह्यात आहेत माजी मंत्री असणारे तानाजी सावंत यांनी राणा जगजीत सिंह पाटील यांना थेट आव्हान दिले नसले तरी महायुती अंतर्गत अनेक वादग्रस्त विधान करून महायुती मध्ये एक वाक्यता नाही हे त्यांनी बोलून दाखवले आहे. तानाजी सावंत टीका करतात तेव्हा त्यांचा रोख नाव न घेता आमदार राणा जगजितसह पाटील यांच्याकडेच असतो. जाणकार आणि राजकारणामध्ये वावरणाऱ्या सर्वांना हे सहजपणे लक्षात येतो. माजी मंत्री बसवराज पाटील हे लातूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत त्यांच्याकडे तिकडची पक्षाने मोठी जबाबदारी दिली असल्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये विशेषता आमदारांना जगजीत सिंह पाटील यांच्या कार्यक्षेत्रामध्ये बसवराज पाटील फारशी राजकीय ऍक्टिव्हिटी करत नाहीत त्यामुळे त्यांच्यामध्येही फारसे सख्ख्या नाही अशी स्थिती आहे.

अशी सर्व परिस्थिती असली तरी या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील हेच सूत्रधार आहेत हेच  त्यांनी विधानसभा नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती अशा वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये यश प्राप्त करून दाखवून दिले आहेत. भारतीय जनता पार्टीची शिस्त आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा स्वभाव व कार्यपद्धती यांची खूप चांगली भट्टी जमली आहे सर्व तालुक्यांमध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांची चांगली टीम उभी केली आहे या सर्व टीमला योग्य मार्गदर्शन करणे राजकारणाच्या आणि निवडणुकांच्या राजकारणामध्ये लागेल ते मदत सहकार्य करण्याची आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांची पूर्ण तयारी असल्यामुळे कार्यकर्त्यांचा देखील राणा दादा यांच्यावर मोठा विश्वास आहे. राणा दादा सोबत असल्यानंतर कोणत्याच गोष्टीची कमतरता होत नाही हे त्यांनी अनेक निवडणुकीत दाखवून दिले असल्यामुळे कार्यकर्ता वर्ग त्यांच्या कार्यपद्धतीवर खुश आहे. भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक काम करण्यामध्ये देखील आमदार पाटील यांनी जातीने लक्ष घातलेले आहे सर्व बैठका सर्व ऑनलाईन कार्यक्रम सर्व नोंदणी कार्यक्रम तसेच पक्षाने दिलेले सर्व सार्वजनिक उपक्रम यामध्ये राणा दादा जातीने लक्ष देऊन आपल्या समर्थकांना विशेषता भाजप पदाधिकारी वर्गास सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करतात त्यामुळे पक्ष पातळीवर देखील राहणार दादा यांची बाजू भक्कम आहे

लोकसभा निवडणुकीमध्ये केवळ अर्चनाताई पाटील यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली त्यामुळे आमदारांना जगजितसिंह पाटील यांना यश प्राप्त करता आले नाही. राज्य पातळीवर लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्यावरून विशेषतः महायुतीमधून कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पक्षाला जागा सोडायची हेच निश्चित नसल्यामुळे अर्चनाताई पाटील यांना राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जाऊन उमेदवारी घ्यावी लागली. या निवडणुकीत देखील आमदार राणा जगजीत सिंह पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली परंतु अर्चनाताई पाटील यांना विजय प्राप्त करता आला नाही. केवळ  23 दिवस मतदानाला शिल्लक असताना अर्चनाताई पाटील यांना निवडणूक लढण्यासाठी सांगितले गेले त्यामुळे पक्षीय रजकारण आणि जन्मताच सन्मान करण्यासाठी वेळेची कमतरता जाणवली.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडे सर्व तालुक्यांमध्ये विकासाच्या कामाची आराखड्याची तयारी करण्यामध्ये आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी आपला संपूर्ण वेळ आणि लक्ष केंद्रित केले आहे अनेक योजनांना शासनाची मान्यता मिळवण्यात त्यांना यश मिळाले आहे. वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये झालेच पाहिजेत या आग्रहानेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रयत्न करतात आणि मुख्यमंत्री महोदय देखील त्यांना प्रतिसाद देतात हेच वेळोवेळी दिसून आले आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार राणा जगदीश पाटील यांनी तुळजापूर नळदुर्ग आणि ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त करून योजनांना मान्यता आणली आहे आगामी काळात तुळजापूर तालुक्यात विक्रमी विकास कामे होतील असा जाणकारांचा अंदाज आहे. सर्वसाधारणपणे धाराशिव जिल्हा हा आमदार राणा जगजितसह पाटील यांचाच बालेकिल्ला झाल्याचे चित्र आज दिसत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 5 3 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे