ई-पेपरक्रिडा व मनोरंजन
रविवारी हॉटेल स्कायलंड येथे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या उपस्थितीत पंचरंग प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धेचा पारितोषिक सोहळा
या निमित्ताने पंचरंग परिवारातील गुणवंत विद्यार्थी आणि कलावंतांचा सन्मान होणार

0
0
3
0
9
5
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आघाडीचे प्रसिद्ध लेखक दासू वैद्य यांची असणार प्रमुख उपस्थिती, नगराध्यक्ष विनोद गंगणे, उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी राहणार उपस्थित.
तुळजापूर दिनांक 22 डॉक्टर सतीश महामुनी
पंचरत्न प्रतिष्ठानच्या वतीने रविवार 22 मार्च सायंकाळी सहा वाजता हॉटेल स्कायलंड येथे राज्यस्तरीय पंचरंग करंडक एकांकिका लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. जिल्ह्यातील नाट्यप्रेमीनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन स्पर्धा संयोजक महेश धुमाळ व दिग्विजय भोसले यांनी केले आहे.

हॉटेल स्कायलंड सभागृहात आयोजित केलेल्या या समारंभाला अध्यक्ष म्हणून तालुक्याचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील, नगराध्यक्ष विनोद गंगणे, उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, प्रमुख अतिथी नामवंत लेखक दासू वैद्य, प्रसिद्ध अभिनेते उमेश जगताप, प्रसिद्ध अभिनेते शंतनू गंगणे , पंचरंगाचे अध्यक्ष श्रीकांत नानापुडे, सचिव प्रा. संभाजी भोसले, उपाध्यक्ष सचिन घोडके आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. याशिवाय या पारितोषक वितरण सोहळ्याच्या निमित्ताने विविध क्षेत्रात यशस्वी कामगिरी केलेल्या पंचगंगा प्रतिष्ठानच्या परिवारातील विद्यार्थ्यांचा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या शुभहस्ते गुणगौरव होत आहे यामध्ये सौ. सरोजा अमृतराव, सौ.निता क्षीरसागर, डॉ. शिवतेज भोसले, डॉ. निवीता नन्नवरे, कुमारी सृष्टी पाटील, कुमारी ऋतुजा रोचकरी, कासिम सय्यद, स्वप्निल भोसले, डॉक्टर रिया शिंदे, भक्ती वळेकर, शिवतेज उळेकर, तुषार साखरे, आदिती घोडके, रुहान गंगणे, श्रुती चोपदार व आयुष चोपदार यांचा या गुणवंत विद्यार्थी व कलावंतांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन पंचरंग प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

0
0
3
0
9
5



