आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
उद्योजक महिला आणि महिला बचत गट यांना सदैव पाठबळ देणार, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात आवश्यक काम करणार – नवनिर्वाचित अध्यक्ष सौ अर्चनाताई पाटील
भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून इतिहासात पहिल्यांदा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या खुर्चीवर बसल्या सौ.अर्चनाताई पाटील, जिल्ह्यात महायुती भक्कम

0
0
3
5
3
8
धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीचा ऐतिहासिक विजय,
नवनिर्वाचित अध्यक्ष सौभाग्यवती अर्चनाताई पाटील यांनी ग्रामीण धाराशिव जिल्ह्याला विकासाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करण्याची दिले आश्वासन
धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष आणि धाराशिव लेडीज क्लबचे अध्यक्ष सौ अर्चनाताई पाटील याच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होणार हे निश्चित होते परंतु राजकीय चर्चेमध्ये त्यांच्या अध्यक्षपदाच्या होण्याच्या बाबत उलट सुलट चर्चा होती परंतु ती केवळ चर्चा होती प्रत्यक्षात महायुती अवैध आणि भक्कम आहे हेच 55 पैकी 45 मते प्राप्त करून महायुतीने सिद्ध केले आहे. मारुती आमदारा जगजीत सिंह पाटील आणि सौभाग्यवती अर्चनाताई पाटील यांच्यावरील हा मोठा विश्वास मानला जातो आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महायुतीच्या सौ. अर्चनाताई पाटील आणि उपाध्यक्षपदी सौ. उषाताई रवींद्र गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज झालेल्या निवड प्रक्रियेत ५५ पैकी तब्बल ४५ मते महायुतीला मिळाली. विक्रमी यश असून महायुतीवर घटक पक्ष आणि मित्र पक्षांनी दाखवलेला विश्वास आहे. महायुतीने दाखवलेली जिल्ह्याचे विकासात्मक वाटचालीसाठी दिशादर्शक आहे असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
सौ. अर्चना पाटील यांच्या रुपाने इतिहासात प्रथमच धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपला मिळाले आहे. ही बाब ऐतिहासिक, अभिमानास्पद आहे. हा विजय महायुतीच्या भक्कम एकजुटीचा, विकासाभिमुख विचारसरणीचा आणि धाराशिव जिल्ह्यातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा आहे. हे यश अपेक्षित होते महायुती कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला अध्यक्ष पदाचा दावा पार पाडत होती असेही या निमित्ताने आमदार पाटील यांनी सांगितले.
नूतन अध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील व उपाध्यक्ष सौ. उषाताई रवींद्र गायकवाड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले, शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होईल, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारे निर्णय अधिक वेगाने पुढे जातील, असा विश्वास आमदारांना जगजीत सिंह पाटील यांनी दिला आहे.
महायुती सरकारच्या विकासाभिमुख धोरणांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून अधिक बळ मिळत असून, धाराशिव जिल्ह्याच्या प्रगतीला नवी दिशा आणि नवे बळ मिळेल, याची खात्री आहे असे उद्गार यानिमित्ताने आमदारांना जगजीत सिंह पाटील यांनी काढले आहे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्यांना त्यांनी आगामी काळात चांगले काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राआत्या पवार, पालकमंत्री ना. प्रताप सरनाईक, माजी मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत, माजी मंत्री बसवराज पाटील, माजी आमदार राजन साळवी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार राहुल मोटे, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, श्री सुरेश बिराजदार, श्री सुनील चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, रिपाईचे राजाभाऊ ओव्हाळ, श्री संताजी चालुक्य, श्री अभय चालुक्य, श्री राहुल पाटील सास्तुकर यांच्यासह महायुतीच्या सर्वच घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आमदार राणा जगदीश पाटील यांनी आभार मानले आहेत.
नवनिर्वाचित अध्यक्ष सौ अर्चनाताई पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रांमध्ये काम करण्याचे अभिवचन या निमित्ताने दिले असून महिला सक्षमीकरण करीत असताना बचत गटांच्या महिलांनी उद्योजक महिलांना पाठबळ देण्याचे काम आपण आगामी काळात लक्ष केंद्रित करून करणार असल्याचे सांगितले आहे. खूप मोठ्या प्रमाणात धाराशिव जिल्ह्यामध्ये महिला उद्योजक निर्माण झालेले आहेत उमेद च्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देखील मिळालेले आहे या पुढील काळात उद्योग क्षेत्रामध्ये या महिलांना स्थिर करून आर्थिक उलाढाल वाढवण्यासाठी शासनाच्या योजनांचा उपयोग करण्यात येईल यासाठी बचत गट आणि इतर सर्व उद्योजक महिलांना तांत्रिक ज्ञान देऊन पाठबळ देण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत असे अभिवचन या निमित्ताने नवनिर्वाचित अध्यक्ष सौ अर्चनाताई पाटील यांनी अनौपचारिक चर्चा करीत असताना सांगितले आहे.
0
0
3
5
3
8





