ई-पेपरमहाराष्ट्र
नगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, भाजपाचे जिल्हा शिवाजी बोधले, सावरकर मंचाचे अध्यक्ष बाळासाहेब यांच्याकडून शिवछत्रपतींना अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने सावरकर विचार मंचाच्या वतीने शिवजयंती साजरी

0
0
2
6
6
1
सावरकर विचार मंचाच्या वतीने उत्सव साजरा, प्रभारी नगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी यांची प्रमुख उपस्थिती
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टीच्या राजकारणामध्ये सेवाभावी वृत्तीने कामकाज करत आहोत, आमदार राणा जगजितसह पाटील, नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे काम खूप चांगल्या पद्धतीने जनमानसामध्ये प्रस्थापित झाले आहे अशी प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोधले यांनी दिली.
देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी वर्ग याला केंद्रबिंदू ठेवून वेगवेगळ्या योजना करण्यात आलेले आहेत या योजनांमध्ये समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे असे आवाहन या निमित्ताने भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोधले यांनी केले. खंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा शिवजयंतीच्या निमित्त छत्रपतीना मानाचा मुजरा करण्यात आला. शुभप्रभूंच्या पुतळ्यास पुष्पहार, घालुन पुजन करून मान वंदना देण्यात आली. तुळजापूर नगरीचे प्रभारी नगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोधले, सावरकर विचारमंचचे अध्यक्ष बाळासाहेब शामराज, उपाध्यक्ष उमेश गवते, तरुण भारतचे जेष्ठ पत्रकार अंबादास पोपळे, भाजपाचे माजी शहराध्यक्ष शांताराम पेंदे, सावरकर विचार मंचाचे पदाधिकारी महेश आप्पा गरड, सदस्य सचिन अमृतराव , महेश कुलकर्णी, या प्रसंगी उपस्थिती होती.
या निमित्ताने प्रभारी नगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी यांनी तमाम तुळजापुरातील जनतेस छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने आपल्या शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नगर परिषदेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
0
0
2
6
6
1



