ई-पेपर

रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानतर्फे डॉ. कैलास गायकवाड यांचा गझलमित्र पुरस्काराने होणार गौरव

संमेलन सर्वांसाठी खुले आहे.

0 0 2 6 6 1

राज्यस्तरीय मराठी गझल संमेलनाचे रविवारी पुण्यात आयोजन

पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राज्यस्तरीय मराठी गझल संमेलनाचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात डॉ. कैलास गायकवाड यांचा गझलमित्र पुरस्काराने गौरव केला जाणार आहे.

मराठी गझल संमेलन रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० ते सायंकाळी ५ या वेळात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आले असून अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे असणार आहेत, अशी माहिती ॲड. प्रमोद आडकर, भूषण कटककर, प्रज्ञा महाजन, मैथिली आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. संमेलनाचे संयोजन वैशाली माळी करीत असून निरुपमा महाजन, वैभव कुलकर्णी, मुक्ता भुजबले, अश्र्विनी जगताप यांचा विशेष सहभाग असणार आहे.

ज्येष्ठ गझलकार प्राचार्य सतीश देवपूरकर, मसूद पटेल, साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

प्रभा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली रंगत-संगत गझल संमेलन आयोजित करण्यात आले असून यात डॉ. मृदुला खैरनार-कुलकर्णी, सुनीति लिमये, मीना शिंदे, सुजाता पवार, स्वाती यादव, वैजयंती आपटे यांचा तर मिलिंद छत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करम गझल संमेलनात प्रज्ञा महाजन, चैतन्य कुलकर्णी, डॉ. मंदार खरे, नचिकेत जोशी, माधुरी डोंगळीकर, शीला टाकळकर, प्राजक्ता वेदपाठक यांचा सहभाग असणार आहे.

प्रमोद खराडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित गझलविधा गझल संमेलन एकमध्ये प्रशांत पोरे, विशाल राजगुरू, जनार्दन म्हात्रे, अभिजीत काळे, गणेश भोसले, कुमार चव्हाण, निलोफर फणीबंद शेख, वासंती वैद्य तर शाम खामकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कझलविधा गझल संमेलन दोनमध्ये शेखर गिरी, दास पाटील, सतीश मालवे, रवींद्र सोनवणे, आनंद खांदेवाले, अमिता पैठणकर, एकनाथ धनवे, वैशाली माळी यांचा सहभाग असणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे