ई-पेपर
पतसंस्थेच्या गत ३६ वर्षात ३६ रक्तदान शिबिराच्या माध्यमातून विक्रमी २९४६ बॅगा रक्त संकलन _ तुळजाई पतसंस्थेचे चेअरमन राजाभाऊ देशमाने
0
0
1
8
1
2
तुळजाई पतसंस्थेचे शिबिरात २९४६ व्यक्तींचे रक्तदान _ चेअरमन राजाभाऊ देशमाने
तुळजापूर दिनांक २५ प्रतिनिधी
तुळजाई पतसंस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित शिबिरात १११ रक्तदात्यांनी रक्तदान केले दरम्यान तुळजाई मंडळ व पतसंस्थेच्या गत ३६ वर्षात ३६ रक्तदान शिबिराच्या माध्यमातून विक्रमी २९४६ बॅगा रक्त संकलन केल्याचे तुळजाई पतसंस्थेचे चेअरमन राजाभाऊ देशमाने यांनी सांगितले. ३६ वर्षापासून सातत्याने रक्तदान शिबिर घेणारे तुळजाई मंडळ व पतसंस्था समाजाचा विश्वास प्राप्त करून कार्यरत आहे असे उद्गार यानिमित्ताने संस्थापक चेअरमन पंडित जगदाळे यांनी काढले.
तुळजाई पतसंस्थेच्या वतीने सोलापुर येथील डॉ.हेडगेवार रक्तपेढी यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन नगरसेवक पंडितराव जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तुळजाई पतसंस्थेचे चेअरमन राजाभाऊ देशमाने संचालक अमीर शेख,राम भोजने,महेश व्हटकर,मकसूद शेख,संजय देशमाने,निलेश एकदंते धनंजय कुंभार आदी उपस्थित होते . तुळजाई मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब भोजने, उपाध्यक्ष सूरज जगदाळे , सचिव विकास भोजने,सहसचिव विवेक माहुले, बाळासाहेब शेरेकर कोषाध्यक्ष श्रावण डोके उपस्थित होते.
0
0
1
8
1
2



