
0
0
3
5
3
8
संस्कार भारतीच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला
तुळजापूर दि ८ डॉ. सतीश महामुनी
पर्यावरणाचे रक्षण आणि संतुलन राखण्यासाठी समाजाचा पुढाकार आवश्यक – संस्कार भारती देवगिरी प्रांत अध्यक्ष प्रा. स्नेहलताई पाठक
संस्कार भारती अखिल भारतीय द्विमासिक व्याख्यान पुष्प सातवे संपन्न झाले. संस्कार भारती देवगिरी प्रांताच्या अध्यक्ष प्रा. स्नेहलताई पाठक यांचे “भारतीय संस्कृती मधील पर्यावरण संरक्षणाची परंपरा” या विषयाचे ऑनलाइन व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रेखा बैजल या होत्या. याप्रसंगी महामंत्री जगदीश देशमुख, अखिल भारतीय प्रतिनिधी सौ अनिता करकरे उपस्थित होते. प्रारंभी अखिल भारतीय प्रतिनिधी सौ अनिता करकरे यांनी या उपक्रमाची आणि कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. या विषयाच्या अनुषंगाने आपले विचार मांडले.
भारतीय संस्कृती प्राचीन संस्कृती आहे यामध्ये आपण पर्यावरण पूरक सण उत्सव आणि कार्यक्रम साजरे करत असताना पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण यामुळे पर्यावरण संतुलन राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. आपण सर्वांनी पर्यावरणाचे संरक्षण करीत सण साजरे केले पाहिजेत असे आवाहन या निमित्ताने प्रमुख वक्त्या व संस्कार भारतीच्या प्रदेशाध्यक्ष प्रा. स्नेहलताई पाठक यांनी केले.
प्रमुख अतिथी ज्येष्ठ साहित्यिक रेखा बैजल यांनी याच विषयाच्या अनुषंगाने बोलताना पर्यावरण संतुलन ही खूप मोठी समस्या असतानाही त्यासाठी केले जाणारे प्रयत्न अत्यंत कमी आहेत. पर्यावरणाचे संतुलन राखल्याशिवाय होणारी प्रगती अपूर्णच आहे असेही त्यांनी यानिमित्ताने नमूद केले. अनेक उदाहरणं घेऊन त्यांनी हा विषय समजावून सांगितला. प्रारंभी डॉ. शुभांगी कुलकर्णी यांनी ध्येय गीत व डॉ. वैशाली गोस्वामी यांनी अतिथींचा परिचय दिला. सूत्रसंचालन ज्येष्ठ रंगकर्मी सुनीता घाटे यांनी व आभार प्रदर्शन सौ. गीता रावतोळे यांनी केले. या निमित्ताने विविध प्रांतामधील पदाधिकारी आणि कलावंत या व्याख्यानाला ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.
0
0
3
5
3
8



