कृषीवार्तामहाराष्ट्र

नळदुर्ग साठी ६ कोटी किल्ल्यासाठी १४ कोटी नळदुर्गमध्ये मोठा विकास निधी- आमदार राणा दादा यांच्याकडून घोषणा

पर्यटना चालना देण्यासाठी किल्ला विकास, पर्यटनाच्या अनुषंगाने नळदुर्ग मध्ये जिल्ह्याचे केंद्र होण्याची शक्यता

0 0 3 5 3 8

तुळजापूर पाठोपाठ नळदुर्ग येथे  मोठा विकास निधी

आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीतील आश्वासनांची पूर्तता करताना शहरासाठी ६ कोटी रुपयांचा विकास निधी, किल्ल्याच्या विकासा साठी सुमारे १४ कोटी रुपयांचा विकास निधी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तुळजापूरच्या पाठोपाठ नळदुर्ग नगरपरिषदेला राज्य सरकारकडून मोठा आर्थिक निधी मिळत असल्यामुळे आगामी काळात नळदुर्ग शहराचा चेहरा बदलून जाणार आहे. राणा दादा यांच्या नेतृत्वाखाली बदलत असलेला नळदुर्ग शहराचा विकास धाराशिव जिल्ह्यातील इतर नगरपरिषदासाठी निश्चितच प्रेरणादायी असाच राहणार आहे. मोठी लोकसंख्या असलेल्या या शहराला आजपर्यंत एवढा मोठा विकास निधी प्राप्त झालेला नाही परंतु राणााा दादा यांच्या नेतृत्वाखाली राज्यशासनाने भरीव निधी दिल्यामुळे नळदुर्ग शहर नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी राणा दादा यांच्या प्रति अत्यंत आदर व्यक्त केला आहे. नळदुर्ग शहरासाठी हा निधी अत्यंत आवश्यक होता कारण खूप मोठ्या समस्या येथे असल्यामुळे शहरासाठी आवश्यक असणाऱ्या नागरी सुविधा देण्यासाठी हा निधी निश्चितच उपयोगी पडणार आहे ज्याची दखल राणा दादा यांनी तातडीने घेतली आणि राज्य सरकारने हा निधी दिल्याबद्दल त्यांनी शहराच्याााा वतीने आमदार राण दादा यांचे पूर्ण व्यक्त केले

.नळदुर्ग नगर परिषद अंतर्गत श्री अंबाबाई मंदिर सभागृह बांधकामाचे भूमिपूजन तसेच सुमारे ६ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

नळदुर्ग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात असून महायुती सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरात सर्वत्र सुरू असलेली विकासकामे ही प्रगतीची साक्ष देत आहेत.

नळदुर्गकरांनी विकासाच्या मुद्द्याला साथ देत मोठ्या विश्वासाने नगर परिषद आपल्या ताब्यात दिली. त्या विश्वासास पात्र राहत, सुमारे ६ कोटी निधीतील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कामांमुळे शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होऊन नागरिकांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या विकासकामांमध्ये शहरातील विविध भागातील रस्ते बांधकाम, नाली-गटारी, स्मशानभूमी विकास, सभामंडप, सभागृह तसेच संरक्षण भिंत अशा कामांचा समावेश असून यामुळे शहराच्या विकासाला नवी चालना मिळणार आहे.

 नळदुर्गकरांसाठी आणखी एक आनंदाची बाब म्हणजे नळदुर्ग किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी तब्बल १४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामामुळे किल्ल्याचे रूप पालटणार असून अद्ययावत सोयीसुविधांमुळे देश-विदेशातून पर्यटक आकर्षित होतील आणि स्थानिक युवकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.

यावेळी नगराध्यक्ष बसवराज धरणे, भाजपा नेते नितीन काळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुनील चव्हाण,   श्री. नय्यर जहागिरदार, श्री. शशिकांत पुदाले यांच्यासह नगर परिषद पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व शहरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 5 3 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे