ई-पेपर

रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी तुळजाभवानी मातेची कवड्यांची माळ, कुंकू रवाना

रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये तुळजापुरला विशेष मान

0 0 3 8 2 7

शिरकाई देवीला साडी-चोळी अर्पण करण्याचा तुळजापूरला मान

तुळजापूर – छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा ३५२ वा सोहळा ६ जून रोजी रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा होत असून, या ऐतिहासिक सोहळ्यासाठी तिर्थक्षेत्र तुळजापूर येथून आई श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्पण केलेले कुंकू, १०८ अबुंकी कवड्यांची माळ तसेच शिरकाई देवीसाठी साडी-चोळी व ओटीचे साहित्य मंगळवारी (दि. २ जून) रायगडाकडे रवाना करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी पूजित झालेले कुंकू आणि १०८ कवड्यांची माळ दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर पाठविण्याची परंपरा आहे. यावर्षीही श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने हे पूजित साहित्य नगराध्यक्ष तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त विनोद गंगणे यांच्या हस्ते रवाना करण्यात आले.

रायगडावरील राजसदरेवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी परिधान करण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या १०८ अबुंकी कवड्यांच्या माळांसह जगदीश्वर मंदिर, गडदेवता शिरकाई देवी, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, होळीवरील पुतळा तसेच पालखी सोहळ्यातील महाराजांच्या पुतळ्यासाठी स्वतंत्र माळा पाठविण्यात आल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील असे एकमेव राजे मानले जातात की ज्यांना आपल्या कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेसोबत चांदीच्या सिंहासनावर विराजमान होण्याचा मान प्राप्त झाला. नवरात्रोत्सवात देवीच्या सिंहासनावर भवानी तलवारीसह महाराजांचा विशेष महाअलंकार मांडला जातो, ही परंपरा आजही जपली जात आहे.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी उपेंद्र गोविंद तामोरे, मंदिर संस्थानचे विश्वस्त तथा नगराध्यक्ष विनोद गंगणे, व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने, शिवप्रेमी सतीश खोपडे, गणेश पुजारी, महेश गवळी, श्रीकांत कदम, अनिल आगलावे, शिवशंकर म्हमाणे, गणेश भिंगारे यांच्यासह अनेक शिवभक्त उपस्थित होते.
रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी तुळजापूरहून पाठविण्यात आलेले हे पूजित साहित्य शिवछत्रपतींच्या कुलदैवताशी असलेल्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक नात्याची पुन्हा एकदा साक्ष देणारे ठरत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 8 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे