ई-पेपरमहाराष्ट्रराजकिय
शिवसेनेचे नेते ऋषिकेश मगर तुळजापुरात सत्ताधारीचे भूमिकेत, एका भेटीत पाच कोटी रुपये विकास निधी मंजूर, खासदार ओमराजे यांच्या प्रयत्नाला यश
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना नेते ऋषिकेश मगर यांची पत्रकार परिषद, विकास कामांमध्ये राजकारण करणार नाही
0
0
4
4
5
3
आम्ही विकास कामात राजकारण करणार नाही – ऋषिकेश मगर,
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे तुळजापूर शहराला प्रभाग विकासासाठी पाच कोटी रुपये पहिला टप्पा मंजूर, ओम राजे यांच्या अभिनंदन आणि आभार साठी पत्रकार परिषद

तुळजापूर दिनांक १७ डॉक्टर सतीश महामुनी
तुळजापूर शहरांमध्ये अनेक प्रभागांमध्ये विकास कामे करण्याची मोठी गरज आहे, ही गरज लक्षात घेऊन खासदार ओमराजे निंबाळकर व आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली यामध्ये तुळजापुरातील प्रभाग निहाय विकासाची गरज आणि तुळजाभवानी मंदिरामध्ये विकास कामे करत असताना पुजारी बांधवांना विश्वासात घेण्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सर्व पातळीवर योग्य ते सहकार्य केले जाईल असे ठोस आश्वासन आमच्या शिष्टमंडळाला मिळाल्याची माहिती शिवसेनेचे नेते ऋषिकेश मगर यांनी तुळजापुरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कामाची पद्धत आणि जनतेबरोबर त्यांची असणारा विश्वास लक्षात घेऊ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुळजापूर येथील विकास कामांना निश्चितपणे मदत केली जाईल निधीची कमतरता येऊ देणार नाही, चांगले काम करा जनतेचे प्रश्न सोडवा असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या श्रेष्ठ मंडळाला दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्वासन आणि विकास कामासाठी विशेषता पुजारी बांधवांच्या तक्रारीदाराने ऐकून घेण्यासाठी दिलेला विश्वास मला अत्यंत समाधानकारक वाटला. वेळोवेळी पुजारी बांधवांची होणारी अडचण आणि संभ्रम अवस्था दूर करण्यासाठी आपण शिवसेना पक्षाच्या वतीने निश्चितपणे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करणार आहोत असे अभिवचन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिवसेना नेते ऋषिकेश मगर यांनी दिले या निमित्ताने खासदार ओम राजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना त्यांनी शुभेच्छा देऊन जनतेच्या हिताच्या कामासाठी आपण खासदार ओमराजे निंबाळकर यांना सदैव पाठबळ देऊ असे आश्वासन दिले. 
आपण मुख्यमंत्री फडणवीस ,उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या बोलण्यानुसार निश्चितपणे निवडणुका संपल्या की राजकारण संपते आणि नगरसेवकांना पदाधिकारी सर्व शहराचे नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी असतात या काळात कोणताही विकासात्मक दुजाभाव केला जाऊ नये ही शासनाची भूमिका असते अशा प्रकारचा मतप्रवाह समोर पाहिल्यानंतर निश्चितपणे शासन, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, खासदार ओमरजे निंबाळकर यांच्यासह इतर सर्वच लोकप्रतिनिधी यांनी निपक्षपाती आणि कोणताही राजकीय दृष्टिकोन समोर न ठेवता सर्वांची विकास कामे आणि प्रश्न सोडवण्यासाठी काम केले पाहिजे असे दिसून आल्याचे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिवसेनेचे नेते ऋषिकेश मगर यांनी स्पष्ट केले.
आगामी काळात निश्चितपणे तुळजाभवानी मंदिर प्रश्नाच्या अनुषंगाने देखील चर्चात्मक तोडगा काढून पुजारी बांधव व्यापारी बांधव यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यामध्ये देखील चांगले लक्ष घातलेले आहे आगामी काळात याविषयी तुळजापूरकरांना त्याची स्पष्टपणे जाणीव होईल याचा अनुषंगाने खासदार ओमराजे निंबाळकर तुळजापूर मध्ये जनता दरबार घेऊन सर्वांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी जनतेमध्ये येणार आहेत असे देखील या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना नेते ऋषिकेश मगर यांनी सांगितले. 
0
0
4
4
5
3



