नगरपरिषद कार्यालयात तुळजापूर च्यावतीने श्रींच्या पालखीचे मानाचे पहिले स्वागत नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने नगरपरिषदेच्या वतीने शहराच्या संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहीम पार पडली.
नगरपरिषदेच्या या स्वागत प्रसंगी नगरसेविका प्रियाताई गंगणे, मुख्याधीकारी अजिंक्य रणदिवे , उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, नगरसेवक लखन पेंदे, नरेश आमृतराव, आनंद सावंत,दीनेश क्षीरसागर, विजय कंदले,आमर हंगरगेकर नगरसेविका निता क्षीरसागर यांच्या शुभहस्ते कणे स्टाॅफ धाराशिव रोड येथे करण्यात आले.
यावेळी नगरपरिषद कार्यालयातील नगर अभियंता अतुल तोंडारे, चांगदेव ढोले, बापूसाहेब रोचकरी, बालाजी कोळी,प्रशांत चव्हाण,विश्वास मोटे, बालाजी जाधव, सुनील पवार लेखापाल शरयु पाटील, पुष्पांजली मंगरुळे,संज्योत सावंत तसेच नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. या निमित्ताने तुळजापूरच्या नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी सर्व शहरवासीयांना गजानन महाराजांच्या पालखीच्या आगमनाने निमित्ताने शुभेच्छा दिल्या, संपूर्ण गावाची नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता आणि ठिकठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्याचे सुशोभीकरण केले होते.
परंपरागत पद्धतीने गजानन महाराजांची ही पालखी तुळजापूर येथे तीर्थक्षेत्रा असणाऱ्या तुळजाभवानीच्या मंदिरात येते गजानन महाराजांच्या पादुका आणि मानकरी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतात त्यानंतर येथील लोहिया मंगल कार्यालय येथे या पालखीचा मुक्काम संपन्न होतो. अनेक सेवा देणारे भाविक भक्त शेगावच्या या गजानन महाराजांच्या पालखीच्या स्वागत आणि इतर सुविधा देण्यासाठी दिवसभर प्रयत्नशील असतात. भक्ती भवानी हजारो लोक या पालखीचे दर्शन घेतात.
तुळजाभवानी मंदिरामध्ये पारंपरिक पोळा सण साजरा, देवीच्या गाभाऱ्यापर्यंत जातात दर्शनासाठी बैल जोडी
7 days ago
नको ती चर्चा बंद करा… कोणकोणत्या गोष्टीवर महाराष्ट्रात राजकारण होते, पर्युषण पर्वाच्या निमित्ताने मांस विक्रीचे राजकारण पेटले…
1 week ago
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बुद्धिबळाचा पट यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात रंगणार, तुळजापुरात ११ व १२ सप्टेंबर रोजी आंतर विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धा
1 week ago
मुरूमचे नगरसेवक श्रीराम कुलकर्णी यांची श्रीराम गणेशोत्सवाच्या अध्यक्षपदी निवड
2 weeks ago
श्रावणाच्या मंगलमय वातावरणात धाराशिव येथे भव्य मंगळागौर महोत्सव , पहिले पारितोषिक 50 हजार रुपये, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील व लेडीज क्लब वतीने आयोजन
2 weeks ago
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राणा दादांचे प्रयत्न, जिल्ह्यातील खरीप संकटात; शासनाला अहवाल सादर करा शास्त्रज्ञ, कृषी व महसूल अधिकाऱ्यांच्या पथकांकडून तातडीने पाहणी करा – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना
2 weeks ago
ध्यानचंद यांच्या जन्मदिनाचे नीिमित्ताने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये क्रीडा दिन साजरा
2 weeks ago
नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ मध्ये मातीचे गणपती बनवण्याची कार्यशाळा संपन्न
2 weeks ago
भारतीय समाजाला हसविणे सोपे नाही, कारण भारतीयांची मनोवृत्ती सहजप्रवृत्तीपेक्षा निवृत्तीकडे जाणारी, रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे बण्डा जोशी यांचा विशेष सन्मान
2 weeks ago
तुळजाभवानी मंदिर परिसरातील भाविकाची हरवलेली पर्स सुरक्षित सुपूर्त