ई-पेपरमहाराष्ट्र

तुळजापूरच्या विकास प्रश्नासाठी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांची ओमराजे निंबाळकर ऋषिकेश मगर शिष्टमंडळाची भेट

मंदिर विकास आणि तुळजापूर विकासामध्ये पुजारी बांधवांना विश्वासात घेण्याचे आश्वासन - ऋषिकेश मगर यांची माहिती

0 0 4 0 9 4

तुळजापूरच्या मंदिर आणि विकास प्रश्नामध्ये पुजारी बांधवांना विश्वासात घेण्याचे आश्वासन – शिवसेना नेते ऋषिकेश मगर यांची माहिती

तुळजापूर दि 15 डॉक्टर सतीश महामुनी

तीर्थक्षेत्र तुळजापूरचा विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने 1865 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केला आहे, मंदिर आणि शहर विकासामध्ये तुळजापुरातील पुजारी बांधवाला विश्वासात घेतली जावे या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खासदार ओमराजे निंबाळकर व शिवसेना नेते ऋषिकेश मगर यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट घेतली. दरम्यान दोन्ही बड्या नेत्यांनी विकास निधी आणि पुजारांना विश्वासात घेण्याचे खंबीर आश्वासन दिल्यामुळे शिवसेना नेते ऋषिकेश मगर यांनी समाधान व्यक्त केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनुक्रमे शासकीय निवासस्थान वर्षा व नंदनवन येथे खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेना नेते ऋषिकेश मगर, सामाजिक कार्यकर्ते धनंजय मगर यांच्या शिस्त मंडळाने भेट घेतली. याप्रसंगी तुळजाभवानीची प्रतिमा देऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा सत्कार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिष्टमडळाने केला. दरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष बदल केल्यानंतरची ही महत्त्वाची भेट होती.

तुळजाभवानी मंदिर हे परंपरागत पद्धतीने कुलधर्म कुलाचार करण्याचे क्षेत्र आहे, येथील पुजारी बांधव परंपरागत पद्धतीने अनादी काळापासून भाविकांची सेवा करत आला आहे. मंदिरावर आलेल्या वेगवेगळ्या संकटावर देखील पुजारी बांधवांनी आजपर्यंत माफ केली आहे. जेव्हा मंदिराचा विकास होण्याची आज वेळ आलेली आहे तेव्हा याच पुजारी बांधवांना विश्वासात घेतले जात नाही ही बाब खासदार ओमराजे निंबाळकर व शिवसेना नेते ऋषिकेश मगर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली तेव्हा विकास प्रश्नामध्ये निश्चितपणे पुजारी बांधवांना विश्वासात घेतले जाईल असे आश्वासन या दोन बड्या नेत्यांनी दिल्याचे सांगितले.

याशिवाय तुळजापूर शहरात विकासात्मक धोरण लक्षात घेऊन सर्व प्रभागांना समान निधी दिला जावा अशा प्रकारची भूमिका मांडल्यानंतर साडेनऊ कोटीचा विकास आराखडा मंजूर करण्यात येऊन त्यातील पहिला टप्पा पाच कोटी रुपयांचा देण्याच्या आश्वासन मिळाल्याचे देखील या शिष्टमंडळाकडून समजले आहे. नगरपरिषदेच्या विकास निधीच्या अनुषंगाने ही भेट महत्त्वाची मानली गेली आहे. प्रभागातील समस्या आणि विकास निधी याविषयी देखील काही बाबी शिवसेना नेते ऋषिकेश मगर यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साडेनऊ कोटी रुपये निधी देण्याचे मंजूर केले असून यामुळे निश्चितपणे नागरिकांच्या प्रश्नांना आगामी काळात न्याय मिळणार असून या विषयावर आपण प्रत्येक मतदारसंघातील लोकांशी बातचीत करून योजना मंजूर करू अशी माहिती शिवसेना नेते ऋषिकेश मगर यांनी  दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे