ई-पेपरगुन्हेगारी

तुळजापुरात नगरपालिकेचे सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये निवेदन युद्ध, शुद्ध पाण्यासाठी महाविकास आघाडीचे नगरपालिकेसमोर उपोषण, नगराध्यक्ष व त्यांचे नगरसेवक मटका जुगार व्यवसायाच्या विरोधात आक्रमक

0 0 3 5 3 8

तुळजापुरात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने, विरोधकांनी शुद्ध पाण्यासाठी प्रशासनाला विचारला जाब केले उपोषण, नगराध्यक्ष व त्यांच्या नगरसेवकांनी अवैध व्यवसायाच्या विरोधात उघडली मोहीम

तुळजापूर दिनांक 20 डॉक्टर सतीश महामुनी

तुळजापूर नगर परिषदेच्या विरोधात पालिकेतील महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी उपोषण केले आणि आवाज उठवला. यादरम्यान नगराध्यक्ष व त्यांचे इतर नगरसेवक सहकारी यांनी शहरात मटका जुगार चक्रीवादळ विक्री या व्यवसायाच्या विरोधात कारवाई करण्याची पोलीस स्टेशन कडे निवेदनाद्वारे मागणी केली. नगरपालिका परिसरामध्ये आज दिवसभर सत्ताधाऱ्यांनी विरोधक यांच्यामध्ये निवेदन युद्ध चालले.

 

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते नगरसेवक अमोल कुतवळ यांनी पत्रकार परिषद घेऊन शहरांमध्ये अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे लोकांची जीवन अडचणीत सापडण्याची भीती व्यक्त केली होती. त्यानंतर देखील अशुद्ध पाणीपुरवठा सुरूच राहिला म्हणून नगरपालिकेतील काँग्रेसचे व महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी नगरपालिकेसमोर लाक्षणिक उपोषण केले यामध्ये अमोल कुतवळ, रणजीत इंगळे आनंद जगताप अक्षय कदम सौ गायत्री लोंढे यांच्यासह इतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी सकाळपासून पालिकेसमोर तंबू ठोकून बसले होते. दुपारी तीन वाजता मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन या नगरसेवकांचे निवेदन स्वीकारले त्यानंतर झालेल्या चर्चेअंती मुख्याधिकारी यांनी या नगरसेवकांना आपण उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने नगरपरिषद योग्य ती काळजी घ्यावी असे लेखी आश्वासन देणारे पत्र दिले. दरम्यान महाविकास आघाडीने शहराच्या सर्व प्रभागांमध्ये अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे अशा तक्रारीचे सुमारे 400 नागरिकांचे अर्ज आवक जावक विभागात दाखल केले. यामुळे विरोधी नगरसेवकांचे आज दिवसभर सरशी  दिसून आली.

विरोधकांनी शहरातील कचरा उचलण्याच्या मुद्द्यावर देखील प्रशासनावर आक्षेप घेतले आहेत. तुळजापूर शहर स्वच्छता आणि रस्ते स्वच्छता याविषयी वेळोवेळी स्वच्छता करण्यात यावी आणि त्यासाठी देखरेख देखील करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात केलेली आहे.

या आंदोलनाच्या निमित्ताने काँग्रेसचे नेते अमोल कुतवळ यांनी आम्ही लोकांच्या प्रश्नाला घेऊन नगरपालिकेसमोर बसलो आहोत. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी लोकशाही मार्गाने उपोषण केले आहे. आम्ही कोणाबरोबर व्यक्तिगत आणि वैयक्तिक टीका केली नाही. शहरातील नागरिकांचे जीवन चांगले असावे त्यांना शुद्ध स्वच्छ पाणी मिळावे आणि सर्व प्रभाग स्वच्छ आणि सुंदर असावेत अशी महाविकास आघाडीचे आणि काँग्रेस पक्षाची भूमिका आहे त्यामुळे लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही नगर परिषदेच्या विरोधात पुढील पाच वर्षे लढत राहणार आहोत असे सांगितले.

या निमित्ताने काँग्रेसचे नगरसेवक रणजीत इंगळे यांनी जनतेच्या प्रश्नासाठी लोकशाही मार्गाने सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे क्रमप्राप्त आहे आमच्या प्रश्नांची सोडवणूक करून आम्हाला उत्तर पाहिजे आहे आणि लोकांचे चांगली सोय झाली पाहिजे यामध्ये दुसरे राजकारण करण्याचे कारण नाही असे सांगितले. नगरसेवक आनंद जगताप  हे म्हणाले की, नगरपरिषदेचे प्रशासन हे मुख्याधिकारी चालवत असतात त्यांना काम करू द्यावी आम्ही प्रशासनाबरोबर पत्र व्यवहार करत असताना आणि लोकांच्या प्रश्नासाठी दाद मागत असताना सत्ताधारी नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांनी चुकीचा अर्थ काढून राजकारण करू नये अशी भूमिका मांडली आहे.

 

नगराध्यक्षाची पोलिसांना निवेदन  : नगरपरिषद कार्यालयासमोर विरोधी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांचे उपोषण सुरू असताना नगराध्यक्ष व त्यांचे सर्व इतर नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पोलीस स्टेशन गाठले आणि शहरातील दारू मटका चक्री आणि ध्येय विक्री अशा प्रकारचे सर्व अवैध व्यवसाय सरासपणे सुरू आहेत हे प्रकार पोलिसांना माहीत असून देखील कारवाईका करण्यात येत नाही या विरोधात तातडीने हा कारवाई करून हे सर्व प्रकार बंद करावेत आणि या प्रकरणी दोषी असणाऱ्या मूळ मालकांचा पोलिसांनी शोध घ्यावा योग्य ती कारवाई करावी अन्यथा आणि शेकडो कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उचलून आवाज उठवू शहर तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे अशा प्रकारचे कोणतेही अवधी व्यवसाय चालू नये. मंदिराच्या अनुषंगाने देखील अनेक मुद्दे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी उपस्थित करून चुकीच्या परंपरा निर्माण करणाऱ्या लोकां विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. बोगस पुजारी निर्माण करण्याची टोळी या लोकांनी केली आहे त्यामुळे तुळजाभवानी देवीचे मंदिर देखील बदनाम होत आहे यांच्या अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टीमुळे शहर बदनाम होत आहे या विरोधात पोलिसांनी तातडीने पावले टाकावीत अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा देखील नगराध्यक्ष विरोधकांनी यांनी दिला. नगराध्यक्ष विनोद गंगणे, रामचंद्र रोचकरी, विशाल रोचेlकरी, विशाल छत्री, नरेश अमृतराव, पंडित जगदाळे, विजय कंदले, सागर कदम औदुंबर कदम किशोर साठे लखन पेंदे दिनेश क्षीरसागर, नगरसेवक सावंत, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विषयाच्या अनुषंगाने नगराध्यक्ष विनोद गंगणे आणि विशाल रोचकरी यांनी शहरामध्ये स्वच्छता मोहीम चांगल्या प्रकारे चालवली जात आहे.  सुचतेचे चांगले वेळापत्रक तयार केले आहे त्यासाठी कर्मचारी देखील नियुक्त आहेत. 24 तास स्वच्छता केली जात नसते याचे भान देखील राहिले पाहिजे. आगामी काळामध्ये स्वच्छतेचे अनुषंगाने आणखी जास्तीची काळजी घेतली जाईल आणि शहर स्वच्छ व सुंदर राहण्याच्या अनुषंगाने उपाययोजना केल्या जातील अशी माहिती त्यांनी दिली. या निमित्ताने पत्रकारांच्या सोबत नगराध्यक्ष यांनी अनेक विषयावर चर्चा करून पत्रकारांना आश्वासित केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 5 3 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे