ई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूर भारतीय जनता पार्टीचा चेहरा गुलचंद भाऊ व्यवहारे, तुळजापूर वैराग आणि परंडा येथे सत्कार

भाजपचे नेते सुजितसिंह ठाकूर व आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे नेतृत्व

0 0 3 7 0 2

खऱ्या अर्थाने आजचे दिवस भारतीय जनता पार्टीचा सुवर्णकाळ – भाजप नेते गुलचंद व्यवहारे यांची वाढदिवसाच्या निमित्ताने प्रतिक्रिया

तुळजापूर दि २० डॉ.सतीश महामुनी

आजचा काळ भारतीय जनता पार्टीच्या आजपर्यंतच्या कामकाजातील सुवर्णकाळ आहे, देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जो विकास साकार होतो आहे त्यामुळे आजचा काळ सुवर्णकाळ आहे अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी मा. सदस्य  गुलचंद व्यवहारे यांनी दिली आहे. भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते गुलचंद व्यवहारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी आमदार पार्टीचे मार्गदर्शक सुजितसिंह ठाकूर यांनी सत्कार करून आपले शुभाशीर्वाद दिले.

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम करताना मिळालेला अनुभव अत्यंत समाधानकारक आहे अशी प्रतिक्रिया वाढदिवसाच्या निमित्ताने दिली. विद्यार्थी दशे पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि संस्कार भारती तुळजापूर या संघटनेमध्ये गुलचंद व्यवहारे यांनी अनेक वर्ष काम केले. भाजपचे नेते सुजितसिंह ठाकूर यांनी तुळजापूर तालुक्यात गुलचंद व्यवहारे यांना भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात आणले, पक्षाच्या कामासाठी तन मन धन देऊन निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता पदाधिकारी आणि भाजपचा नेता अशी श्री व्यवहारे यांची ओळख आहे.

अगदी तुळजापूर पासून मुंबई व दिल्ली आणि राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी आपली राजकीय ओळख निर्माण केली आहे. अनेक केंद्रीय मंत्री ,अनेक राज्य मंत्रिमंडळातील मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे अखिल भारतीय सरचिटणीस विनोद तावडे महाराष्ट्राचे सरचिटणीस राजेश पांडे यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे निकटचे संबंध आहेत. राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री महोदय देखील त्यांच्यासमवेत युवा मोर्चा आणि भाजपच्या कामांमध्ये राहिल्यामुळे त्यांचा स्नेह अत्यंत मैत्रीपूर्ण राहिलेला आहे . या राजकीय नातेसंबंधांचा उपयोग आपल्या जिल्ह्यातील आणि जो व्यक्ती काम घेऊन येईल त्यांचे काम करण्यासाठी गुलचंद व्यवहारे संधी समजून उपयोग करतात आणि समोरच्या व्यक्तीचे काम करून त्याचे समाधान करतात ही त्यांची प्रशासकीय कामकाजात निर्माण झालेली कष्टाळू ओळख आहे . अशा प्रकारचे प्रशासकीय पातळीवर यशस्वी काम करणारा नेता म्हणून त्यांना ओळखले जाते. सर्वच राजकीय पक्षांमध्ये गुलचंद व्यवहारे यांचे मित्र आहेत. लोकांच्या कामासाठी पक्ष न बघता समोरच्या माणसाची गरज लक्षात घेऊन त्यांनी वेळोवेळी लोकांना मदत केली आहे. अनेक चांगले आणि वाईट दोन्ही प्रसंग त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून अनुभवले आहेत. राजकारणातील अगदी जमीन पातळीवर काम करणारा नेता म्हणून त्यांना सर्वत्र ओळखले जाते गुलचंद भाऊ याच नावाने ते सर्वत्र परिचित आहेत. सर्वांचा लाडका बंधू भाऊ असा त्यांच्या कामातून निर्माण झालेला परिचय आहे. विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना विरोध करून भाजपचे स्थान निर्माण करण्याचा सुरुवातीच्या काळात त्यांनी प्रयत्न केला.

पक्ष प्रतिकूल परिस्थितीत असताना या लोकांनी केलेले काम निश्चितच आज लोक बोलून दाखवतात चर्चेत आहे. राजकारणाशी बदलते स्वरूप आणि भारतीय जनता पार्टीची निर्माण झालेली प्रभावी प्रतिमा या सगळ्यांचा उपयोग आज भारतीय जनता पार्टीच्या कामांमध्ये सर्वत्र दिसतो आहे यामध्ये गुलचंद भाऊ सारखे सामान्य लोकांच्या कामाला आलेले माणसं आपलं महत्त्व अधोरेखित करीत काम करत आहेत आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये अशाप्रकारे प्रामाणिकपणे आणि निष्ठा पूर्वक काम करणाऱ्या गुलचंद भाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत आमदार राणा जगजीत सिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, तुळजापूरची नगराध्यक्ष विनोद गंगणे, उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, इतर सर्व नगरसेवक पक्षाचे पदाधिकारी संस्कार भारती चे सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे शुभेच्छा दिल्या आहेत. दैनिक तरुण भारत जिल्हा प्रतिनिधी अनिल आगलावे यांनीही या निमित्ताने गुलचंद भाऊ व्यवहारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते सुजितसिंह ठाकूर साहेब यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट पुढील प्रमाणे आहे.. माझ्या जवळचे सहकारी भाजपा नेते श्री. गुलचंदभाऊ व्यवहारे (तुळजापूर) यांनी आज त्यांच्या वाढदिवस दिनी परंडा येथे माझी भाजपा संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. श्री. गुलचंदभाऊ यांचा सत्कार करून त्यांना आरोग्यदायी उदंड आयुष्याकरिता तसेच त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्यात मोठी प्रगती होऊन त्यांच्या हातून अविरत राष्ट्रकार्य व्हावे यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा परंडा तालुका अध्यक्ष श्री. अरविंदबप्पा रगडे, भाजपा नेते उद्योजक श्री. शरद पवार, श्री. रामदास गुडे, राणा नेटके आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 7 0 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे