रथसप्तमीच्या निमित्ताने तुळजाभवानी देवीला रथ अलंकार महापूजा करण्यात आली, शारदीय नवरात्र व शाकांबरी नवरात्र या काळात ज्या महापूजा होतात त्यामधील ही रथ अलंकार महापूजा आहे परंपरागत पद्धतीने रथसप्तमीच्या निमित्ताने ही पूजा देवीस केली जाते. तुळजाभवानी देवी रथामध्ये बसून रथाचे साराध्य करीत आहे असा हा नयन मनोहर देखावा दिवसभर भाविकांना पहावयास मिळाला.
गर्दीचा अंदाज घेऊन तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने दोनशे रुपयांचे पेड दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 26 जानेवारी सोमवारी असल्यामुळे तत्पूर्वी शनिवार आणि रविवार रथसप्तमीचा दिवस अशा विविध कारणांनी खूप मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी तुळजापुरात वाढली. स्थानिक पातळीवर असणारे सर्व लॉजिंग देखील यामुळे हाउसफुल च्या स्थितीत दिसून आले. शहरामध्ये सर्वत्र गर्दी दिसून आली. सर्व वाहन तळे आणि रस्त्याच्या दुतर्फा वहनांची गर्दी देखील या गर्दीमुळे झाली होती.
“वाहन चालक भाविकांची नाराजी”
अशा गर्दीच्या वेळी पोलीस प्रशासनाकडून बाहेर जाऊन आलेल्या भाविकांना विशेषता चार चाकी वाहन चालकांना सहकार्य होत नाही अशी तक्रार पुणे आणि सांगली सातारा येथील भाविकांनी बोलून दाखवली. एका बाजूला पार्किंग अपुरी व्यवस्था असताना दुसरा बाजूला टॅक्स वसुली मात्र शक्तीने केली जाते हे नको आहे. आम्ही तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भक्ती भावाने तुळजापूरला नेहमी येतो परंतु नेहमी होणार हा त्रास राज्य शासनाने थांबवला पाहिजे अशी मागणी देखील श्रीकांत सरदेशमुख या पुणे येथील भाविकांनी व्यक्त केली. राज्य शासन एका बाजूला यात्रा अनुदान आणि विविध सवलती देत असताना दुसऱ्या बाजूला भाविकांना सक्तीचा वाहन प्रवेशाचा कर लावणे अत्यंत चुकीचे आहे या निर्णयाबाबत फेरविचार करण्यात यावा अशी सूचना देखील या भाविकांनी मांडली.