
0
0
1
8
1
4
धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष सौभाग्यवती अर्चनाताई राहणार जगजीतसिंह पाटील, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या सुनबाई, याच पाटील घराणेने सुमारे ६० वर्ष धाराशिव जिल्ह्यावर राज्य केले आहे. राजकीय वारसा असलेले कुटुंब, आमदार राणा जगजीत सिंह पाटील हेदेखील तेवढेच मुत्सद्दी आणि विकासाला महत्त्व देणारे राजकीय नेते आहेत.त्यांच्याच पत्नी धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये दोन वेळा सभागृहामध्ये काम केलेल्या अनुभवी नेत्या आहेत.
राजकीय हेवेदावे निश्चित असतात परंतु पाटील कुटुंबाला सातत्याने राजकीय दृष्ट्या टारगेट करण्याची फॅशन या जिल्ह्यात जुनी झाली आहे, त्याचाच भाग म्हणून भारतीय जनता पार्टीच्या शिरस्त नेत्यांनी विशेषता धोरणात्मक निर्णय म्हणून खासदार आणि आमदार यांच्या कुटुंबामध्ये जिल्हा परिषदेचे निवडणूक तिकीट न देण्याचा निर्णय झालेला होता या पार्श्वभूमीवर सौभाग्यवती अर्चनाताई पाटील जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार नाहीत असे वृत्त प्रसारित झाले होते.
समाज माध्यमावर याबाबतची माहिती प्रसारित झालेली होती. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मात्र अर्चनाताई पाटील यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याची बातमी बाहेर पडली आहे. सायंकाळी त्यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीचे दर्शन देखील घेतलं, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. अस्मिता कांबळे, भाजपचे नेते विशाल रोचकरी, जिल्हा परिषद काक्रंबा मतदार संघाचे उमेदवार दयानंद शिंदे, भाजपाचे युवक नेते बंटी गंगणे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद असल्यामुळे मला पुन्हा पक्षाने निवडणूक लढवण्याची संधी दिलेली आहे. कार्यकर्त्यांची इच्छा पूर्वीपासूनच आहे, आपण देखील निवडणूक लढवणार हे निश्चित होतेच, परंतु धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने आपण या काळात पक्षाच्या आदेशाची वाट पाहिली आणि विशेष म्हणजे निवडणूक लढवण्याच्या अनुषंगाने पक्षाने दिलेला आदेश आणि आपण यापूर्वी धाराशिव जिल्हा परिषद सभागृहामध्ये जे काम केले आहे त्या कामाची पावती म्हणून या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्यासाठी जनतेच्या आदेशाचे पालन करीत आपण निवडणूक लढवत आहोत अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद धाराशिव माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी व्यक्त केली.
आमदार राण
0
0
1
8
1
4



