ई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्र

शिवसेना नेते अमराराजे कदम यांनी वाहिली अजित दादा यांना श्रद्धांजली

सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा तुळजापुरात संपन्न

0 0 1 8 1 2

तुळजापूर :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे दि.२८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात अकाली निधन झाले. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून, गुरुवारी दि.२९ जानेवारी रोजी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावरती त्यांच्यावर पुर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी त्यांना मुखाग्नी दिली.
याच पार्श्वभूमीवर, तुळजापूर येथे गुरुवारी सायं.५ ते ८ या वेळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि मान्यवरांनी उपस्थित राहून दादांच्या आठवणींना उजाळा दिला.
धिरज पाटील (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस): “दादांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अमरराजे कदम (जिल्हा सहसंपर्कप्रमुख शिवसेना): “महाराष्ट्रने एक खंबीर प्रशासक आणि जनसामान्यांचा धुरंधर नेता गमावला आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण करण्याचा वारसा त्यांनी जपला होता,” असे मत त्यांनी मांडले.
विनोद पिटु गंगणे (नगरअध्यक्ष भाजपा): ” पवार कुटुंबाला या अपघाती प्रसंगातून सावरायला आई तुळजा भवानी माता शक्ती देवोत असे मत व्यक्त केले.
गोकुळतात्या शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते): ” तुळजापूर विकासाला नेहमीच दादांनी आर्थिक मदत केलेली आहे.आम्हाला दादा जिल्ह्याचे जावाई असल्याने नेहमीच प्रेमाने व आपुलकीने जवळ घेवून विचारपुस करत असत.”असे मत त्यांनी मांडले.
या शोकसभेला शहराध्यक्ष महेश चोपदार, नगरसेवक अमोल कुतवळ, गटनेते औदुंबर कदम, भाजपाचे गुलचंद व्यवहारे, आनंद कंदले, ज्येष्ठ पत्रकार डॉ. सतीश महामुनी, विधिज्ञ जगदीश कुलकर्णी,अमरभैय्या मगर, अजयभैय्या साळुंके, शिवसेना (उबाठा)गटाचे सुधीर कदम,अमरनाना चोपदार,पंडितराव जगदाळे,सज्जनराव साळुंके,बबलू सुर्यवंशी, इंद्रजीत साळुंके,बबन गावडे,बाळासाहेब शामराज, महेंद्र कावरे,आनंद पांडागळे, यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी पुष्पहार अर्पण करून लाडक्या नेत्याला साश्रू नयनांनी श्रद्धांजली वाहिली.

5/5 - (1 vote)

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे