ई-पेपरमहाराष्ट्र
जो राष्ट्रभक्त आहे जो आपली परंपरा पाळतो तो कोणत्याही धर्माचा असो तो हिंदूच आहे – सहकार्यवाह डॉ. गोपाळकृष्णजी
धाराशिव येथे संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने आयोजित "संघ यात्रा" कार्यक्रम

0
0
3
5
4
9
जो राष्ट्रभक्ती करतो, परंपरा पाळतो तो हिंदू आहे मग तो मुस्लिमसह इतर कोणत्याही धर्माचा असो त्याला आम्ही हिंदू मानतो – राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल
तुळजापूर दिनांक 10 डॉक्टर सतीश महामुनी
कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्य, पर्यावरण संरक्षण ,स्वबोध या पंचसूत्रीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात भर असुन या पंचसूत्रीतुन समाज परिवर्तन करण्यासाठी संघ काम करणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरसंघ कार्यवाह डॉ. गोपाल कृष्णजी यांनी केले.
या निमित्ताने उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना संघाच्या शताब्दी वर्षांमध्ये आपण परम पूज्य डॉक्टर हेडगेवार यांच्या विचारांना अंगीकारून मानवी प्रगती सोबत अध्यात्मिक मुल्ये जोपासणे गरजेचे आहे. संस्कारमय, राष्ट्रभक्त आणि सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणारी पिढी घडवण्याची सर्वांची जबाबदारी आहे त्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन संघांचे सह सरकार्यवाह डॉ कृष्णगोपालजी यांनी केले.
धाराशिव येथे परिमल मंगल कार्यालय येथे संघ यात्रा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सामाजिक जीवनातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी “प्रमुख नागरिक संगोष्ठी” परिसंवाद संपन्न झाला, यात डॉ कृष्णगोपालजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर जिल्हा संघचालक ऍड रवींद्र हरिदास कदम, लातुर विभाग संघचालक संजय अग्रवाल उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉक्टर कृष्णगोपाल जी पुढे म्हणाले की संघाच्या 90 हजार शाखा दररोज सुरू असुन 40 हजार साप्ताहिक व मासिक शाखा अश्या 1 लाख 30 हजार ठिकाणी संघ स्वयंसेवक एकत्र येतात, मातृभूमीची प्रार्थना करतात. संघांचे कार्य गेली 100 वर्षापासुन निरंतर चालत असुन ते दिवसेंदिवस वाढत आहे. हिंदू समाजाने संघ कार्य समजुन घेतले पाहिजे, हे कार्य सर्वांचे आहे. डॉ.हेडगेवार यांनी सुरु केलेले कार्य समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात देशव्यापी बनले आहे.
तीन हजार वर्षापुर्वी भारत जागतिक मोठे आर्थिक केंद्र होते, इथून अनेक वस्तु निर्यात केल्या जायच्या. तक्षशिला, नालंदा यासह अनेक ठिकाणी विश्वविद्यालय चालवले जायचे, तिथे 10 हजार विद्यार्थी एका वेळेस शिक्षण घ्यायचे. अनेक महान राजे जग जिंकणारे इथे होते. अंकगणित, बीज गणित यासह नक्षत्र व अंतराळ, वैदिक, व्याकरण भाषा, कपडे, परिमाण व्यवस्था, कृषी आणि तंत्रज्ञान हे भारताने जगाला दिले
या देशावर अनेक आक्रमकानी राज्य करत धर्मातर , अनेक अत्याचार 1 हजार वर्ष केले. भारताने कधी कुणाला लुटले नाही, महिलावर अत्याचार केला नाही. अध्यात्मत श्रेष्ट असताना भारतात अत्याचार झाले. देशात जातीय, आर्थिक, भाषा, वर्ण विभाजन झाल्याने परकीय आक्रमण झाले. भारतातील सगळे राजे एकत्र आले नाहीत, गझनी, गौरी, अबद्दली, बाबर,इस्ट इंडिया कंपनी, इंग्रज यांच्या विरोधात एकत्र आले नाहीत हे लोक एक एकाला हरवत आले आणि जिंकले, ते एकत्र कधी आले नाही. हिंदू समाज माझा आहे असा भाव निर्माण झाला पाहिजे. यातूनच डॉ हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली.
देशाच्या दुर्दैशेला परकीय, आक्रमक जबाबदार नसुन भारतीय आहेत. कर्मकांड आणि रूढीमध्ये आपण अडकुन राहिलो.
इस्लाम व इसाई पेक्षा हजारो वर्ष परंपरा असलेला हिंदू समाज असुन इतिहास, कर्मकांड, अध्यात्म, विविधता आहे. सन्मान, धोका न देणे ह्या भावांना मानणारा हिंदू आहे. हिंदुत्व मर्यादित नसुन त्यात अनेक ग्रंथ, पुस्तके, रूढी परंपरा आहेत. जो सगळ्यांची चिंता करतो, काळजी घेतो,जीवन जगण्याची पद्धती देतो, संस्कार शिकवतो, समाजात राहायला शिकवतो तो हिंदू आहे, आता हे जगाला कळत आहे. अमेरीका, रुस व इतर देशातील लोक आता भारतात हिंदू समजण्यासाठी येत आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध 40 संघटना सेवा कार्य करीत आहेत. वैद्यकीय, विद्यार्थी कामगार, शेती, शिक्षण सारख्या विविध क्षेत्रात संघ काम करत असून त्या माध्यमातून नागरिकांना राष्ट्रीय भावना आणि राष्ट्रहितासाठी जोडत आहे. देशात चांगले नागरिक बनविणे हे संघाचे ध्येय आहे. स्वतंत्रता, बंधुत्व व समानता हे तिन्ही गोष्टी असल्या पाहिजेत, हे डॉ आंबेडकर यांनी संविधान सभेत सांगितले.
पर्यावरण संवर्धन केले पाहिजे, देशातील 50 टक्के जमीन सिंचनाखाली नाही. ग्लोबल वर्मिंग प्रश्न भेडसावत आहे त्यामुळे झाडे लावावीत, प्लास्टिक वापर करू नये. कोळसा पेट्रोलिंग डिझेलचा बेसुमार वापर होत असल्याने पृथ्वीचे तापमान वाढत आहे. पर्यावरण हा विषय संघाने हातात घेतला आहे. कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्य, स्वबोध या विषयावर संघ काम करीत असुन प्रयत्नशील आहे.
देशात विकास, उन्नती होत आहे मात्र घर, गल्ली, परिवार याकडे लक्ष देऊन संस्कारमय पिढी घडवावी लागणार आहे. भौतिक प्रगती सोबत अध्यात्मिक भाव वाढणे गरजेचे आहे, समाजासाठी काही करावे लागेल. जगाला अध्यात्म देण्याचे काम करायचे आहे. संघाच्या या अभियानात सर्वांनी सहभागी होऊन योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. जो राष्ट्रभक्ती करतो, परंपरा पाळतो तो हिंदू आहे मग तो मुस्लिमसह इतर कोणत्याही धर्माचा असो त्याला आम्ही हिंदू मानतो असे ते म्हणाले.
या परिसंवादाच्या प्रास्ताविकात संघाचे धाराशिव जिल्हा कार्यवाह श्री.अजय जानराव यांनी संघाच्या शताब्दी वर्षात धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेल्या व्यापक गृहसंपर्क अभियान अंतर्गत 650 स्वयंसेवक यांनी 270 गावात जाऊन 35 हजार घरात संपर्क व संवाद साधला. हिंदू संमेलन अंतर्गत गाव, वस्ती स्तरावर कार्यक्रम घेण्यात आले. धाराशिव जिल्ह्यात 15 संमेलन झाले असुन आणखी 35 ठिकाणी संमेलन होणार आहे. सामाजिक सदभाव बैठका घेऊन त्याच्या अडचणी जाणून घेतल्या. कळंब व उमरगा येथे 3 मे रोजी “प्रमुख नागरिक संगोष्ठी” परिसंवाद कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले.
ऍड सचिन सुर्यवंशी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. यशवंत सुर्यवंशी यांनी वैयक्तीक गीत सादर केले. सुत्रसंचलन विश्वास कांबळे यांनी केले.सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
0
0
3
5
4
9



