ई-पेपरमहाराष्ट्र
गुरुतत्त्वयोग संस्थेचा २८वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा

0
0
1
8
1
2
गुरुतत्त्वयोग संस्थेचा २८वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा
पुणे : गुरुतत्त्व हे मार्गदर्शक तत्त्व असून ते स्वीकारण्याची गरज मानवला आहे. त्या करिता परमतत्पर, संवेदनाक्षम आणि परमसाक्षी असणे आवश्यक आहे. गुरुतत्त्वयोगामध्ये गुरुतत्त्वाशी एकरूप होणे हीच समाधी असून त्यासाठी प्रयत्न करणे म्हणजेच नित्यसाधना होय. गुरुतत्त्वाच्या संपर्कातून शिकणे हाच खरा ज्ञानयोग असून विश्वकल्याणाकरिता कार्य करणे म्हणजे कर्मयोग असे गुरुतत्त्व मानते. गुरुतत्त्वयोग साध्य झाल्यास मानवाला दीर्घायुष्य, आरोग्य, सुखसमृद्धी प्राप्त होईल, असे अभ्यासपूर्ण विवेचन गुरुतत्त्वसाधक तेजा दिवाण व सुचित्रा पेंडसे यांनी केले.
गुरुतत्त्वयोग सार्वजनिक धर्मार्थ विश्वस्त संस्थेचा २८वा वर्धापन दिन सोहळा शिवाजीनगर येथील संस्थेच्या ध्यानमंदिरात आयोजित करण्यात आला होता. या वेळी गुरुतत्त्वयोग प्रणालीचे प्रणेचे अभयकुमार सरदार यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी साधकांच्या अनुभवाने परिपूर्ण गुरुतत्त्ववेध या स्मरणिकेचे प्रकाशन अभयकुमार सरदार, सतिश चाबुकस्वार, नंदकुमार शेळके, तेजा दिवाण, सुचित्रा पेंडसे यांच्या हस्ते करण्यात आले.
गुरुतत्त्वाने विश्वाचे नाटक लिहिले असून त्याची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले आहे. सृष्टीतील प्रत्येक घटकाने या विश्वात आनंद भोगावा आणि तो भोगताना इतरांशी गुण्यागोविंदाने वागून, मदत करून त्यांचे आयुष्य देखील आनंदी करावे हा सृष्टीच्या निर्मितीमागील संकल्प आहे. परंतु मानवाला आपल्या भूमिकेचा विसर पडल्यामुळे तो सहजतेने न जगता द्वेष, स्पर्धा, राग, लोभ यात अडकून दु:ख निर्माण करत आहे आणि गुरुतत्त्वाच्या मूळ संकल्पनेपासून दूर जात आहे. यातून तो विश्वाच्या नाशास कारणीभूत होऊ शकतो. म्हणूनच गुरुतत्त्वाच्या संकल्पनेशी सुसंवाद राखणे आवश्यक आहे.
0
0
1
8
1
2


